Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनपरीक्षण लेखमराठवाडासाहित्यगंध

बाप ओळखता येत नसतो

डॉ ज्ञानेश्वर माशाळकर

0 4 0 9 0 3

बाप ओळखता येत नसतो

आई-बापाची संपत्ती एकदा आयुष्यातून गेली ना मग, माणसाने कितीही संपत्ती कमावली तरी, तो भिकारीच राहतो. माणसाने आपल्या आई वडिलांची खूप काळजी घेतली पाहिजे. कारण या स्वार्थी दुनियेत त्यांच्या एवढं प्रेम करणारे कोणीच भेटणारे नाहीत.आई वडील असतील सोबतीला तर विष सुध्दा अमृत होते.आई वडील नसतील सोबतीला तर सावली सुध्दा चटके देते.खरंच आयुष्यात आई वडील नसतील, तर जीवंत पणी नरक यातना पाहयाला मिळतात. म्हणून ज्यांचे आई वडील जीवंत आहेत त्यांनी आई वडिलांना सांभाळा.

कधी बाप वळण लावत असल्याने वाईट असतो. कधी बाप पैसा नसल्याने वाईट असतो, कधी बाप रागामुळे वाईट असतो. धाकामुळे तर प्रत्येकच बाप वाईट असतो.. अज्ञातलाच बाप सर्वांना माहित असतो पण थोडा जरी कुठे कमी पडला तर बाप बोलणे ही ऐकून घेतो. आतल्या आत हा बाप तसाच रोज रडत असतो. प्रत्येकाच्या गरजांसाठी ऐकटा बापच वाहत असतो सर्वांच्या आवडीची किंमत तो बापच चुकवत असतो मुलांना पायावर उभ करणार औषध म्हणजे बापाचा राग असतो. रागामागे मुलांच सुख पाहणारा हतबल बापच असतो आईसारखा बाप ओळखता येत नसतो घडवण्याच काम हा बापच करत असतो.

बापाला कमी पडण्याची परवानगी नसते. बापाला अडचणी सांगण्याची परवानगी नसते. बापाला थकण्याची ही परवानगी नसते आणि बापाला थांबण्याची पण परवानगी नसते. पण ऐक दिवस म्हतारा झाला की, हाच बाप घरातल्या कोपऱ्यात पडून असतो. नाहीतर अंगणातल्या झाडाखाली ऐकटाच बसून असतो. हा बाप सहजच ओळखता येत नसतो अश्रू दिसू देत नसतो. तो मनातलही बोलत नसतो. म्हणूनच बाप सहसा ओळखता येत नसतो..!!

डॉ ज्ञानेश्वर माशाळकर
ता. उमरगा, जिल्हा धाराशिव.
========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 9 0 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे