
0
5
1
7
8
7
चांदोबाच्या घरी
उंचच उंच चांदोबा
दिसतो किती भारी
चला जावू आपण
सारे चांदोबाच्या घरी
तारकांचा उजेड
वाटे प्रकाशले दिवे
नाही खिडक्या दारे
नाही तिथे रखवाले
किती विलोभनीय
निळे निळे आकाश
रात्रीच्या अंधारात
चंदू मामाचा प्रकाश
झगमग झगमग
चांदोबाच्या घरी
बघायला घर त्याचे
निघाली हो सवारी
प्रतिमा नंदेश्वर
ता. मूल, जि.चंद्रपूर
0
5
1
7
8
7



