0
4
8
2
9
0
शब्दावाचून अडले सारे
“शब्दावाचून अडले सारे
भाव प्रीतीचा कळला रे”
शब्दावाचून कळले सारे
नयनात तुझ्या बसली रे”
“शब्दावाचून अडले सारे
भाव प्रेमाचा कळला ग”
“शब्दावाचून कळले सारे
नयनात तू विसावली ग”
“शब्दावाचून अडले सारे
बंध नात्याचे उमजले रे”
“शब्दावाचून कळले सारे
शब्दांच्या पलीकडले रे”
“शब्दावाचून अडले सारे
भाव मनीचा कळला ग”
“शब्दावाचून कळले सारे
शब्दांच्या अलीकडले ग”
“,शब्दावाचून अडले सारे
रोखण्यात श्वास आला रे”
“शब्दावाचून कळले सारे
तुझ्यात जीव गुंतला रे”
“शब्दावाचून अडले सारे
जीव तुझ्यावर जडला ग”
“शब्दावाचून कळले सारे
ओठांत प्रीत लाजली ग”
हणमंत गोरे
ता:सांगोला, जि:सोलापूर
============
0
4
8
2
9
0



