Breaking
ई-पेपरकवितानागपूरविदर्भसाहित्यगंध

आम्ही मुलं

माधुरी हेमराज लांजेवार

0 4 8 2 9 0

आम्ही मुलं

नका समजू निव्वळ मुलं
जरी विविध जाति-धर्माची
आहोत आम्ही देशाची फुलं
भावना एकात्मतेची .

नका समजू मातीचा गोळा
आहोत तपतपता लाव्हा
भरवली विज्ञानाची शाळा
वाटतो निसर्गाचा हेवा .

अपेक्षा आमची फक्त
करण्या विकास सर्वत्र
करा आम्हा बंधनातून मुक्त
ऐका आमचा कानमंत्र .

रंग , रूप ,आकाराने
आहोत आम्ही वेगळी
बहार आणू कर्तृत्वाने
परिपूर्ण आम्ही मुलं सगळी .

द्या आम्हाला संधी
दावू कर्तबगारी ,
होवू तारांकित नभी
चमकू भूतलावरी .

माधुरी हेमराज लांजेवार
ता.नागपूर जि.नागपूर
====

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे