तांत्रिक कामगार युनियनतर्फे नवीन रुग्णवाहिकेचा ग्रहण सोहळा उत्साहात संपन्न
नागपूर शहर प्रतिनिधी

तांत्रिक कामगार युनियनतर्फे नवीन रुग्णवाहिकेचा ग्रहण सोहळा उत्साहात संपन्न
नागपूर शहर प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज मिडीया
नागपूर : (दि २२) “रुग्णसेवा हीच खरी ईश्वर सेवा” या उदात्त भावनेतून तांत्रिक कामगार युनियन (५०५९) संचालित ॲम्बुलन्स सेवेसाठी नव्या रुग्णवाहिकेचा ग्रहण सोहळा उत्साहात पार पडला.
या सोहळ्याचे उद्घाटन मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर ग्रामीणचे अधीक्षक अभियंता संजय वाकडे, आयुष ब्लड सेंटर अँड कॉम्पोनंट लॅबचे संचालक संजय बारागवने तसेच पंचायत समिती नरखेडचे प्रकाश देशमुख उपस्थित होते तसेच तांत्रिक कामगार युनियनचे सप्तखंजरीवादक तथा माजी प्रादेशिक सचिव नागपूर मोहनदास चोरे, रिल स्टार साहिल कडक व उज्वल काजने यांनीही उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
या रुग्णवाहिकेची संकल्पना साकारण्यात विक्की कावळे, मंगेश चिमोटे, निलेश चक्रपाणी यांचा विशेष सहभाग राहिला. यावेळी माधव चकोर, सौरभ गणोरकर, नकुल होले, रितीक वानखेडे, स्वप्निल आमझिरे, कुणाल आमझिरे व गौरव सावरकर आदी उपस्थित होते.



