Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनपश्चिम महाराष्ट्रपुणेमहाराष्ट्रमुंबईविदर्भ

‘पपेट शो’द्वारे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जागृती

अमृता खाकुर्डीकर, पुणे प्रतिनिधी

0 4 8 2 8 6

‘पपेट शो’द्वारे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जागृती

अमृता खाकुर्डीकर, पुणे प्रतिनिधी

पुणे, दि.24 सप्टें.(प्रतिनिधी) ‘झाडे जगवा, निसर्ग वाचवा’ अशा संदेशातून विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्वं पटवून देण्यासाठी अत्रे प्रशालेमध्ये एका माहितीपूर्ण ‘पपेटशो’चे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.

त्याचबरोबर छान छान गोष्टी, मजेशीर कविता आणि धमाल विनोदी किस्से अशा मनोरंजकपणे मुलांमध्ये वैयक्तिक स्वच्छता, नीटनेटकेपणा, परिसर स्वच्छता या विषयासंबंधीही पपेटशोद्वारे सोप्या पध्दतीने जागृती करण्यात आली.

पपेट शो मधील ‘चिंटू’ आणि ‘मिनी’ या व्यक्तिरेखा; तसेच कुत्रा, गोगलगाय, विंचू, सरडा, कासव, झाड अशा वेगवेगळ्या प्राण्यांची अर्कचित्रे साकारली होती. अंजली बेहेरे व शोभा पोकळे या दोन कलाकारांनी समाजिक जाणीवेतून मुलांवर लहानपणीच पर्यावरण व परिसर स्वच्छता या विषयाचे संस्कार रूजवण्याच्या उद्देशाने या मजेशीर बाहुलीनाट्याची सुंदर संकल्पना साकार केली आहे.

अत्रे प्रशालेमध्ये विद्यार्थ्यांसमोर इंदिरा अत्रे वाचन कक्षाच्या वतीने विद्यार्थ्यांना मनोरंजनाच्या माध्यमातून हसत खेळत ज्ञान व माहिती मिळावी, या उद्देशाने ग्रंथपाल माहितीतज्ज्ञ प्रसाद भडसावळे यांनी या शोचे आयोजन केले होते. याप्रसंगी अत्रे प्राथमिक शाळेतील १ली ते ४थीची विद्यार्थी आणि शिक्षकवृंद उपस्थित होता.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे