Breaking
गुन्हेगारीनागपूरब्रेकिंगमहाराष्ट्रविदर्भ

नांद येथे दुसऱ्यांदा अघोरी कृत्य घडल्याचा प्रकार उघड

रजत डेकाटे, प्रतिनिधी

0 6 3 3 1 1

नांद येथे दुसऱ्यांदा अघोरी कृत्य घडल्याचा प्रकार उघड

गावातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण

रजत डेकाटे, प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज मिडीया

मालेवाडा, (दि १४) : भिवापूर तालुक्यातील नांद गावात अघोरी कृत्य केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी महा. अंधश्रद्धा निर्मूलन समिती व पोलीस प्रशासनाने तत्काळ दखल देत घटनास्थळी भेट दिली आणि गावकऱ्यांच्या मनातील भीती दूर करून अंधश्रद्धेविरुद्ध जनजागृती केली.

नांद गावातील विजय मिसाळ यांच्या घरालगत असलेल्या रस्त्यावर हा अघोरी प्रकार करण्यात आला होता. विविध रंगीत सिंदूर बुका यांचा वापर करून रस्त्यावर गोल वर्तुळ तयार करण्यात आले होते आणि त्यामध्ये पिठाची बाहुली व लिंबू ठेवून अघोरी पूजा मांडण्यात आली होती. विजय मिसाळ यांना पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार निदर्शनास आला. त्यांनी ताबडतोब परिसरातील नागरिकांना बोलावून याची माहिती दिली.

नांद परिसरातील अशा प्रकारचे अघोरी कृत्य घडण्याची ही दुसरी घटना असल्याने गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे. सदर प्रकरणाची माहिती मिळताच ‘भिवापूर अंधश्रद्धा निर्मूलन तालुका समिती’ने तात्काळ पोलीस प्रशासनाला अवगत केले. यावर पोलीस प्रशासनाने तत्परता दाखवत घटनास्थळी धाव घेतली. भिवापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विजय माळी यांनी गावकऱ्यांना मार्गदर्शन करताना ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन कायदा २०१३’ या कायद्याची सविस्तर माहिती दिली. तसेच अंधश्रद्धेच्या आहारी न जाता कायद्याची मदत कशी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे तालुकाध्यक्ष सचिन काळे यांनी गावकऱ्यांशी संवाद साधत विज्ञानाची कास धरण्याचे आवाहन केले आणि अशा अनिष्ट प्रथांना ठामपणे दूर करण्याचे धडे दिले. तालुका उपाध्यक्ष मिथुन दुपारे यांनी गावकऱ्यांच्या मनातील अंधश्रद्धेची भीती पूर्णपणे नाहीशी करण्यासाठी अघोरी पूजेतील लिंबू व पिठाची बाहुली उपस्थितांना हातात घेऊन दाखवण्यात आली, तसेच पाण्याचा वापर करून ते वर्तुळ मिटविण्यात आले.

नांद गावात कमी कालावधीत अघोरी कृत्याची ही दुसरी घटना घडल्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित तांत्रिक-मांत्रिकाला तात्काळ जेरबंद करावे, अशी आक्रमक मागणी संतप्त गावकऱ्यांनी केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 3 3 1 1

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे