ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजनदादरा नगर हवेलीसाहित्यगंध
भ्याड हल्ला
सुनिता लकीर आंबेकर/कांबळे दादरा आणि नगर हवेली

0
4
0
9
0
3
भ्याड हल्ला
राष्ट्रीय हाॅलीबाॅल ,फुटबॉलपटू
उत्तर प्रदेशाची कन्या साहसी
कायदे शिक्षण अवध विद्यापीठतुनी
चपळ,हुशार अन् धाडसी
नोकरीसाठी पूर्वपरीक्षा देताना
रेल्वेचा प्रवास होती करत
गुंडांची नजर पडली तिच्यावर
घडले अघटित ,अनपेक्षित
गळयातल्या सोन्याच्या चैनीसाठी
भ्याड हल्ला केला भुरट्या चोरांनी
हारणे ना रक्तात, गुंडाशी चार हात
झासीच्या राणीसम खुब लढी मर्दानी
रूग्णालयात शुद्ध येता पाहिले
राॅड होता एका पायात
एक पाय कापावा लागला
आभाळ कोसळले आयुष्यात
खोल निराशा अन् वेदनेचा काळ
अंगी दुर्दम्य इच्छाशक्ती अन् महत्वाकांक्षा
अपंगत्वात हार ना मानता
एव्हरेस्ट शिखर गाठण्याची आकांक्षा
सुनिता लकीर आंबेकर/कांबळे
दादरा आणि नगर हवेली
0
4
0
9
0
3





