0
5
4
1
0
6
ओल्या बटा
ओल्या बटा मधूनी ओघळे
हाडाची कांड केल्यानं घाम
चूल पेटविण्यास लागे दाम
अनवाणी पायानं करते काम
ओल्या बटा मधूनी ओघळे
घामानं सर्वांग झालंय चिंब
तळपते डोक्यावर सूर्यबिंब
माय भासे सूर्याचे प्रतिबिंब
ओल्या बटा मागे सारूनी
माय धावते न घेता विसावा
शिणलेल्या तनाला, मनाला
घामाच्या धारा देतात थंडावा
सुकल्या जागीच ओल्या बटा
नभांगणी चढताच भगवी छटा
उठल्या हृदयी आनंदाच्या लाटा
पावलं चालती घराच्याच वाटा
ओल्या बटांचा बांधून बुचडा
थंड पाण्याने धुतला मुखडा
काळजाचा तुकडा अमृत पेई
शिणलेलं शरीर स्वर्गसुख घेई
संग्राम कुमठेकर
जिल्हा लातूर
=======
0
5
4
1
0
6



