
0
4
8
2
9
3
वार्याचे गाणे
पानांची सळसळ
हळूच शीळ घाले
कानामागून येऊन
काहीतरी बोले .
वारा जाई हळुवार
भेदून पाण्याचा झरा
देतो ओलसर गारवा
नाही कशाची परवा .
वार्याचे गाणे
हवेहवेसे वाटते
निसर्गाच्या सान्निध्यात
हळूच शीळ घालते .
सळसती पाने आणि
झुळझुळ वाहणारी नदी
गातात सुमधूर गाणी
नेहमीच वार्यासंगे .
वार्याच्या गाण्याचा
अंदाजच निराळा
कधी शांत… सुखावणारा
कधी उन्माद सारा .
माधुरी हेमराज लांजेवार
ता.नागपूर जि.नागपूर
==÷=÷÷====÷
0
4
8
2
9
3



