ई-पेपरकवितापश्चिम महाराष्ट्रपुणेसाहित्यगंध
शहाणपण देगा देवा
पांडुरंग एकनाथ घोलप रोहकडी, जुन्नर, पुणे
0
4
8
2
9
0
शहाणपण देगा देवा
शहाणपण देगा देवा
वरदान मागतो तुज
जाण राहो स्वत्वाची
नको अहंकारी बीज
लाभो शहाणपण ऐसे
जेणे परमार्थाची गोडी
नसो लालसा कोणती
नको स्वार्थाची खोडी
क्षमाशील असे आचरण
सदा घडो मज हाती
आदराने जोपासता यावी
स्विकारली जी नाती
निष्कलंक रहावे जीवन
सत्कर्म नित्य घडावे
सकलांच्या कल्याणार्थ
प्रत्येक पाऊल पडावे
घडो पुण्यकर्म सदा
राहो पापभिरू वृत्ती
वृथा देहाभिमान नको
असो तुझे ठायी भक्ती
पांडुरंग एकनाथ घोलप
रोहकडी, जुन्नर, पुणे
0
4
8
2
9
0



