
0
6
5
6
0
4
आजी माझी
आजी गेली, पण आठवण कायम राहिली…
दोन वर्षे झाली आजी, तू आम्हाला सोडून जाऊन,
पण मन आजही शोधतं तुला, प्रत्येक क्षणी आठवून…
तुझ्या मायेचा स्पर्श आजही, मनाला जाणवतो,
तुझ्या प्रेमळ शब्दांचा आवाज, कानात घुमत राहतो…
तुझ्या हातची माया नव्हती, जगात कुठेच मिळणारी,
तुझ्या कुशीतली ऊब होती, दुःख विसरून टाकणारी…
दार उघडं आहे आजही, पण तू मात्र दिसत नाहीस,
मनात खूप काही सांगायचं आहे, पण ऐकायला तू नाहीस
तुझ्या आठवणींचा सुगंध, आजही दरवळत राहतो,
तुझ्या संस्कारांचा दिवा, आयुष्यभर प्रकाश देतो…
काळ पुढे सरकत राहील, वर्षे कितीही जातील,
पण आजी तुझ्या आठवणी, हृदयातून कधीच पुसल्या जाणार नाहीत. आजी, तू आज आमच्यात नाहीस, पण आमच्या आठवणींत कायम आहेस. तुझी जागा कोणीही घेऊ शकणार नाही!
डॉ ज्ञानेश्वर माशाळकर
उमरगा, जि. धाराशिव
0
6
5
6
0
4



