
0
4
0
8
9
0
- माझी पाककला: टोमॅटो पापडी
साहित्य: २ मोठ्या वाट्या मैदा,पाव वाटी पिठीसाखर ,पाव वाटी तूप,१ चमचा चिली फ्लेक्स,१ चमचा काळे मीठ, चवीनुसार साधे मीठ, पाव चमचा सोडा,एक चमचा जाडसर मिरेपूड, दोन मोठ्या टोमॅटोची पेस्ट, तळण्यासाठी तेल ,एक चमचा आमचूर पावडर, चाट मसाला इत्यादी.
कृती: मैदा चाळून त्यात तुपाचे मोहन व वरील साहित्य घालून घट्ट मळून घ्या.जाडसर पोळी लाटून गोल कटरने छोटया पापड्या कापून तेलात मंद आचेवर तळून घ्या.गरम असतानाच त्यावर चाट मसाला, पिठीसाखर, आमचूर पावडर भुरभुरावी.खाण्यासाठी तयार खट्टेमिठ्ठी टोमॅटो पापडी.
मीनाक्षी काटकर
दारव्हा यवतमाळ
0
4
0
8
9
0





