0
4
8
3
0
0
कुरुक्षेत्र
नकोत रुसवे फुगवे
नकोत मनात हेवेदावे
जपा नात्यांतले मैत्र
नका बनवू मित्रांनो
रम्य घराचे कुरुक्षेत्र
जुळेना जरी विचार
तरी सांभाळावी मने
सुखाचा तोच मंत्र एकमात्र
नका बनवू मित्रांनो
रम्य घराचे कुरुक्षेत्र
मुले – बाळे नांदती सौख्याने
नात्यांची माया द्या प्रेमाने
वादविवादाने मूल होईल भित्रं
नका बनवू मित्रांनो
रम्य घराचे कुरुक्षेत्र
वैशाली अंड्रस्कर ,चंद्रपूर
=======
0
4
8
3
0
0



