‘वसुधा फाउंडेशन’ आयोजित माध्यम परिषदेस उत्स्फूर्त प्रतिसाद
वसुधा नाईक, पुणे प्रतिनिधी
‘वसुधा फाउंडेशन’ आयोजित माध्यम परिषदेस उत्स्फूर्त प्रतिसाद
वसुधा नाईक, पुणे प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज नेटवर्क
पुणे: ( दि १६) वसुधा फाऊंडेशन,पुणे आयोजित पहिली माध्यम परिषद तसेच पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन केले. यावेळी कार्यक्रम अध्यक्ष, परिषद अध्यक्ष डॉ. मधुसूदन घाणेकर, उद्घाटक मा प्रमोद सूर्यवंशी दिग्दर्शक,प्रमुख पाहुणे प्रा. शरदचंद्र काकडे देशमुख काकडे देशमुख शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, विशेष उपस्थिती आधुनिक बहिणाबाई मा.विमलताई माळी प्रसिद्ध कवयित्री तसेच वसुधा फाऊंडेशन अध्यक्षा सौ वसुधा नाईक तसेच मा.वैभव नाईक या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष होते.
यावेळी समाज माध्यम गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले.
हा पुरस्कार साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक,कलेच्या माध्यमातून व विविध क्षेत्रात निस्वार्थीपणे कार्य करतात,आणि इतरांना एकत्र घेऊन काम करतात. विविध स्पर्धेचे आयोजन करतात. तसेच वृत्तपत्रातून बातमी देणे, व्हॉट्स ऍप, इंस्टाग्राम , फेसबुक या द्वारे ऑनलाईन उपक्रम घेतात. तसेच लोकांना एकत्र करून वेगवेगळे उपक्रम, कार्यक्रम राबवतात अशा
लोकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मा.पूजा पठारे (युवा क्रांती संघटना,पुणे शहर महिलाध्यक्षा), मा.मधुकर धायकर (शिक्षक ध्येय साप्ताहिक,संपादक) मा.मिलिंद शेटे ( सांस्कृतिक वार्ता वृत्तपत्र ),मा.योगेश बालाजी हरणे (अध्यक्ष, काव्ययोग काव्य संस्था,पुणे.), मा. गौरव अर्जुन पुंडे ( राजयुवा प्रतिष्ठान,पुणे ), मा.जयश्री बेलसरे (ज्योतिष तज्ञ) मा.गंगाधर डिंगोळे (आदिती न्यूज,संपादक), मा.सुभाष तुपे (अभिनेता, संगीत शिक्षक) मा.सुभाष शेटे (समाजशील न्यूज,संपादक), मा.बाबा तारे ( सकाळ न्यूज रिपोर्टर), मा.अर्चना म्हस्के ( दिवांकुर बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्था, संस्थापिका), मा. संतोष आम्ले ( दैनिक युवक आधार,संपादक), सौ.संध्याराणी कोल्हे ( दैनिक साहित्यसेवा उपसंपादक), मा. रामदास तांबे ( ट्यूब प्रसारमध्य टुडे ), मा. गणेश दणाने (नारी शक्ती बहुउद्देशीय,संस्थापक), मा. शहाजान शेख (संपादक, कात्रज वार्ता), मा.सुनील मतकरी (मानवसेवा आश्रम पाथर्डी), मा.अनिल रेळेकर ( सामाजिक कार्य) मा. स्वाती मराडे (साहित्य गंध सहसंपादक) श्री. दत्ता खंदारे ,(संपादक भगवे वादळ) शेख अब्दुल रहीम शेख बाबू (हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन) (समाज माध्यम संवर्धन पुरस्कार २०२५ ) श्रीमती भारती महाडिक, (समाज माध्यम कला संवर्धन पुरस्कार २०२५)मा.दिलीप नाईक (एकपात्री कलाकार), (नाट्यशास्त्र कला संवर्धन पुरस्कार २०२५) मा. प्रिया प्रमोद दामले (संस्थापिका,तितिक्षा इंटरनॅशनल,पुणे) असे २४ पुरस्कार सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
सर्व पुरस्कार्थीना मानवस्त्र तसेच आकर्षक असे सन्मानचिन्ह देण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन वसुधा फाऊंडेशन अध्यक्षा सौ वसुधा नाईक, योगेश हरणे,गौरव पुंडे,मयुरी लायगुडे,श्रीराम घडे शीतल शर्मा यांनी आयोजित केले. या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन कवी श्रीशैल सुतार यांनी केले.



