ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भसाहित्यगंध
रंगोत्सव – मनोत्सव
डॉ. राजेश चंद्रकांत काळे 'राजस' जि. नागपूर

0
5
1
7
9
6
रंगोत्सव – मनोत्सव
रंग शब्दांचा..
जेव्हा ओठांवरून अलगद उतरतात
तेव्हा ते मनाला गंध देतात.
रंग भावनांचा..
जे हृदयाच्या कॅनव्हासवर उमटतात
आणि आयुष्याला अर्थ देतात.
रंग माणुसकीचा..
जो भेद मिटवतो, अंतर विरघळवतो
आणि हातात हात देऊन जगायला शिकवतो.
रंग प्रेमाचा..
जो नजरेतून झिरपतो
आणि स्पर्शातून विश्वास बनतो.
रंग नामाचा
जो कर्तृत्वाने उजळतो,
आणि सन्मानाने टिकून राहतो.
रंग मानाचा..
जो आत्मसन्मानात फुलतो
आणि व्यक्तिमत्त्वाला तेज देतो.
रंग भक्तीचा..
जो अहंकार धुऊन काढतो
आणि अंतर्मनात शांतीचा दीप लावतो.
डॉ. राजेश चंद्रकांत काळे
‘राजस’ जि. नागपूर
0
5
1
7
9
6



