Breaking
अहमदनगरकवितानागपूरमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

शब्द सारे संपले आता; शर्मिला देशमुख-घुमरे

0 4 8 2 9 4

शब्द सारे संपले आता

नको वाटतो गोंधळ गडबडाट
माझेच खरे सिद्ध करणे
कोण काय समजायचे ते समजो
निवडते आता शांत राहणे

चूक म्हणो कोणी म्हणो बरोबर
घ्यायचीच नसते खबर कोणाची
समोर येता निर्मळ वागणे
नसती उठाठेव काय कामाची

हारले म्हणो कोणी म्हणो जिंकले
मी मी म्हणण्यात असतील गुंतले
नको तशांची मज परछाईही
एकटे राहणे मला परवडले

उगा द्वेष भाव नको मनाला
क्षणक्षण उठतो मग जाळायाला
कान डोळे बंद ठेवून
आवडते मजला चालायाला

किंतू परंतू सारे विसरून
कसे उमलले प्रसंग विसरता
खाली वर बोलायाला
शब्द सारे संपले आता

शर्मिला देशमुख -घुमरे, बीड
===========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे