‘विकासाचा विश्वास देणारा अर्थसंकल्प’; राजेश जैन
‘विकासाचा विश्वास देणारा अर्थसंकल्प’; राजेश जैन
अर्थमंत्र्यांनी सोन्यावरील कस्टम ड्यूटी नऊ टक्के अनपेक्षितपणे कमी केल्याने लोकांना सुखद धक्का बसला. सोन्या वरच्या या कपातीमुळे लोकांची चांदी झाली, असे आत्ता वाटत असले तरी ही कपात फार जास्त काळ टिकणार नाही. कारण येत्या काही काळात जीएसटी मध्ये त्याची भरपाई होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोनेखरेदी करायची असेल तर आत्ता हिच योग्य वेळ म्हणता येईल.
सर्वसामान्य करदात्यांना इन्कम टॅक्स मध्ये अपेक्षित सूट आत्ता जरी जाहिर झालेली नसली तरी अर्थमंत्र्यांनी पुढील सहा महिन्यांत इन्कम टॅक्स मध्ये अमूलाग्र बदल करण्याचे सूतोवाच केले आहे. स्टँडर्ड डिडक्शनमध्ये 25 हजाराची वाढ करून आणि नवीन कर प्रणालीत स्लॅबमध्ये बदल करून काही प्रमाणात.कर कमी केलेले दिसत आहेत. बरीच सामान्य जनता शेअर बाजारात गुंतवणुक करू लागल्यामुळे त्यांचे खूप आर्थिक नुकसान होत होते. त्यांना परावृत्त. करण्याकरता शेअर मार्केट वायदा व्यवहारावर टॅक्स्ट वाढवण्यात आला आहे.
स्टार्टअप वरील एंजेल टॅक्स रद्द, नवीन रोजगाराच्या संधी, लहान मुला करीता NPS वात्सल्य योजना, शहरी गरीब लोकांकरिता घरासाठी सबसिडी, महिला सशक्तीकरण योजना. ग्राम सडक योजना, स्किल डेव्हलपमेंटला प्रोत्साहन, 12 नवीन इंडस्ट्रियल पार्क तयार करण्याची घोषणा, मूलभूत सुविधा वर रू.11 लाख कोटीची तरतूद इत्यादी गोष्टी अर्थ संकल्पाची जमेची बाजू आहेत. त्यामुळे हा अर्थसंकल्प समाजातील सर्व घटकांच्या सार्वांगीण विकासाची ग्वाही देणारा वाटतो..



