ई-पेपरकवितापश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रसांगलीसाहित्यगंध
हुकमी एक्का
वृंदा(चित्रा)करमरकर ता. जि.सांगली

0
5
7
4
4
8
हुकमी एक्का
निवडणूक आली जवळी
स्वार्थी मंडळी गोळा झाली
महागाईची होळी पेटली
आपली पोळी कुणी भाजली
हातात होता हुकमी एक्का
विरोधासाठी विरोध पक्का
एकदा मिळता सत्तेचा ठेका
कोण आपला कोण परका?
इथे आपल्या पुरते पहावे
मतदारांनी शब्दा जागावे
मिळेल तेवढे पदरी घ्यावे
किती घोटाळे कुणी मोजावे
ज्याने त्याने तुंबडी भरावी
नाती कोणती कुणी जपावी
कशास नसत्या उठाठेवी?
खुर्चीवर नजर मात्र ठेवावी
असे वागतो तोची शहाणा
जनहित पाहे तोच दिवाणा
सत्तेपुढे चालते का शहाणपण
सदा शिकवण तुम्ही जाणा
वृंदा(चित्रा)करमरकर
ता. जि.सांगली
0
5
7
4
4
8



