“आमदार चषक” जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न
प्रतिनिधी, प्रा. तारका रुखमोडे

“आमदार चषक” जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न
‘मोठी स्वप्नं आणि दृढ आत्मविश्वास यशाचा मार्ग खुला करतात’; जयंत शुक्ला
प्रतिनिधी, प्रा. तारका रुखमोडे
गोंदिया जिल्हा, बिनधास्त न्यूज
अर्जुनी/मोर: (दि २४ मार्च )तालुका क्रीडा संकुल, अर्जुनी/मोर येथे आयोजित “आमदार चषक” जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा 2025-26 चा पारितोषिक वितरण सोहळा 22 मार्च 2026 रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. जिल्ह्यातील तब्बल 284 खेळाडूंनी विविध वयोगटांत सहभाग नोंदवत स्पर्धेला मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या भव्य स्पर्धेचे उद्घाटन माननीय आमदार राजकुमारजी बडोले यांच्या हस्ते झाले. समारोप प्रसंगी विजेत्या खेळाडूंना रोख रक्कम व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वरिष्ठ पत्रकार व भाजप जिल्हा सचिव जयंतजी शुक्ला होते. यावेळी त्यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना सांगितले की, “मोठी स्वप्नं बघण्याची हिंमत आणि ती पूर्ण करण्यासाठी दृढ आत्मविश्वास व सातत्यपूर्ण परिश्रम आवश्यक असतात; तेव्हाच यश मिळते.”
प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित योग प्रचारक दादाजी फुंडे यांनी खेळाडूंना शारीरिक बळकटीसोबत मानसिक संतुलन राखण्याचा सल्ला दिला.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विजयजी कापगते, भाजपा युवामोर्चा जिल्हा सचिव अश्विनसिंह गौतम, व ‘युथ इन ॲक्शन संघटनेचे’ सरचिटणीस नयन रुखमोडे, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष सुधांशु मेहता, सामाजिक कार्यकर्ता निखिल नाकाडे यांच्या हस्ते विजेत्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी सुनिल पवार, धनराज आहुजा, किशोर राठोड, नितुताई पवार यांच्यासह अनेक मान्यवरांची अतिथी म्हणून उपस्थिती लाभली.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव डॉ. महेंद्र हेमणे, क्रीडा प्रशिक्षक थानेद्रसिंह पवार, रेफरी युवराज वाघमारे, क्रीडा शिक्षक पुरुषोत्तम घाटोळे, तसेच माधुरी वनवे, पार्थ तवाडे, किशोर तवाडे, शैलेंद्र फुंडे यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी वनवे मॅडम यांनी केले. खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे आणि उत्साहपूर्ण सहभागामुळे ही स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली असून, जिल्ह्यात क्रीडा क्षेत्राला नवी ऊर्जा मिळाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.



