0
1
9
9
5
7
नवे स्वप्न
प्रयत्नाशिवाय काही नाही
रंगीत स्वप्नांना दिशा नाही
उम्मेद नवी, नवे स्वप्न
पूर्ण करण्याचा सखोल प्रयत्न
जीवन जगणं आपलं स्वार्थ
स्वप्नांनशिवाय जगणं व्यर्थ
निशा संपली उषा उजाळली
कालच्या स्वप्नांशी रंगत जमली
स्वप्न असतात रंग-बिरंगी
कोणता रंग? ठरवू अंतरंगी
स्वप्नांची पूर्तता गालावर हास्य आणतं
मात्र उद्या कोणतं ? ओंजळीत पडतं
पावलोपावली स्वप्न बघू
जीवन मात्र आनंदाने जगू
माधुरी हेमराज लांजेवार
ता.नागपूर, जि.नागपूर
=======
0
1
9
9
5
7