0
1
9
9
5
7
आम्ही सावित्रीच्या लेकी
स्त्रीची विटंबना अन् अत्याचार
चौकटीत बंदिस्त हाच तो इतिहास..
शिक्षणाची संधी ना त्यांचा विचार
तशातही जगत होत्या सहन करत उपहास..
रूढी परंपराचा करण्या अंत
जन्माला आली ती जगन्माता..
स्त्री जीवनाचे अंधार हरणारी
तुच खरी आमची भाग्यविधाता..
किती भोगले आई आम्हांसाठी
तरीही सोडली नाही शिक्षण क्रांती..
शेण ही आम्हांसाठी झेलले अंगावर
तुझ्या मनाची तरी ढळली नाही शांती..
उद्धारण्या भारतमातेच्या लेकी
तू दिली गं सर्वं सुखांची आहुती..
आमच्या पंखांना बळ देण्यासाठी
समाजात सहन केली निंदा नालस्ती.
लेखणी मुळेच आज करू शकतो
सुखदुःखाची बेरीज वजाबाकी..
आज प्रगतीच्या पथावर चाललो
अभिमानाने आम्ही सावित्रीच्या लेकी.
मृदुला कांबळे
गोरेगांव -रायगड
=========
0
1
9
9
5
7