0
4
8
2
9
4
पाऊसा थांब जरा….
पाऊसा थांब जरा…
रिपरिप लावली धरा
एवढा नको बरसू
नको डोळ्यात आणू आसू।।१।।
पाऊसा थांब जरा…
नदी नाले दुथडी
शेत शिवार तुडूंब
वाहताय बांध फोडी।।२।।
पाऊसा थांब जरा…
तू आलास आनंद झाला
बीज अंकुरले धरा
आता रोपं वाढू दे जरा।।३।।
पाऊसा थांब जरा…
पिकात तृण आलय भरा
निंदणी कोळपणी होऊ दे जरा
पिक बहरू दे शिवारा।।४।।
पाऊसा थांब जरा…
डोंगर कोसळताय
कुठं गावं बुडताय
पाऊसा जगू दे जरा।।५।।
पाऊसा थांब जरा…
तू आलास कि गेलास
फरक तुला नाही पडत
मात्र तूझ्याविना नाही जगत।।६।।
पाऊसा थांब जरा…
तू नदी नाल्यातून धोधो वाहतोय
दरिखोरीतून कोसळतोय
आता मेघा तू थांब जरा।।७।।
गणेश एन.पाटील
शहादा,जि.नंदूरबार
=============
0
4
8
2
9
4



