बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना
*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ कविता स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट नऊ🎗🎗🎗*
*🥀विषय : विद्रोही मी🥀*
*🍂बुधवार : १४/ मे /२०२५*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*विद्रोही मी*
विद्रोही मी विद्रोही रे
हा नसेच शब्द शृंगार
माझे अभिव्यक्त होणे
असे धगधगता अंगार… //
ना कुणाची खुशामत
असे निर्भिड निर्धास्त
नसे लाचार कुणापुढे
व्यक्त होतो बिंधास्त.. //
इथे माझ्या लेखणीला
ना पुरस्काराचे डोहाळे
हेतूपुरस्सर मांडतो मी
व्यथा वेदनांचे सोहळे.. //
कशाला कुणाची पर्वा
मी साहसी शब्द कर्मी
जशास तसाच बाणा
मी घालतो घाव वर्मी… //
कुणी वंदो कुणी निंदो
मी पर्वा करू कशाला
इमान गहाण नसे कुठे
कुणापुढे दोन पैशाला.. //
वंचित अन् शोषितांचा
असे शब्द माझा उद्गार
अन्यायाच्या विरोधात
पुकारेल सदैव एल्गार… //
आतून असा अस्वस्थ
कसा राहू स्वस्थ मी
लेखणीचे हत्यार हाती
विद्रोही मी “असामी”…
*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💥🔥💥➿➿➿
*विद्रोही मी*
होय,आहे विद्रोही मी
विद्रोह करत राहणार,
नसेल पटत मनाला
ते ते झुगारून देणार…१
राजकीय,सामाजिक
कला क्रीडा साहित्य,
सांस्कृतीक क्षेत्रातील
घडामोडी होती नित्य…२
प्रत्येक घटने मागील
हेतू नेमका अपेक्षित,
होत असेल अन्याय
राहते काय दुर्लक्षित…३
सूक्ष्म निरीक्षणातून
वास्तव चित्र मांडतो,
पटत नाही जे काही
विद्रोह पेटून उठतो…४
स्तुतीपाठक नाही मी
अन्यायविरुद्ध लढतो,
वाचा फुटावी पिढीता
असेच लेखन करितो….५
काव्याच्या माध्यमातून
परखड विचार मांडतो,
पोलखोल करुन सारी
जागृतीचे कार्य करतो…६
*बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💥🔥💥➿➿➿➿
*विद्रोही मी*
विद्रोही मी …
किती सहज तू
मला म्हणून गेलास…
एकदा त्या शब्दाच्या
अर्थाचा विचार तरी केलास..
तुझ्या खांद्याला खांदा लावून,
प्रपंच भार पेलणार होते मी..
पण तुला वेळ देता येणार..
तुझी काळजी घेता येणार..
म्हणून चार भिंतीत रमले मी..
आज काय जरा तुझा
वेळ मागितला तर विद्रोही मी..
तुझ्या सहवासात
शिण माझाही दूर होणार..
तुझ्या मिठीत मी ही विसावणार..
डोळ्यात तेल घालून
तुझ्या प्रतीक्षेत..
आज तरी वेळेत यावास
ह्याच अपेक्षेत…
एवढीच अपेक्षा केली मी..
तरीही तुझ्या नजरेत विद्रोही मी..?
तू तर तुझ्याच मनाचा राजा..
मी ही तुझ्या दिलाची राणी असावे..
बागेतली फुलं जपते मी प्रेमाने
तू ही कधीतरी माझं मन जपावे..
एखादी भावना औपचारिकतेची,
माझ्यासाठी मागते मी…
त्या रितेपणातही विद्रोही मी..?
मग खरेच.. विद्रोह काय असतो,
हे तुला कळणार आता..
मौनात माझ्या, तुझा
अहंकार जळणार आता..
डोळ्यासमोर असून
मूर्तिमंत भासणार मी..
तेव्हा कळणार तुला..
होय…विद्रोही मी..
होय…विद्रोही मी..!
*सौ.संध्या मनोज पाटील अंकलेश्वर*
*©मराठीचे शिलेदार समूह सदस्या*
➿➿➿➿💥🔥💥➿➿➿➿
*विद्रोही मी*
आवडत नाही चुका,
दाखविणे मनुष्यांना.
काय ठरलो म्हणून,
सर्वासाठी विद्रोही मी? (१)
लोटांगण घालणारे,
आवडते त्यांना खूप.
विरोधात बोलताना,
वाटलो विद्रोही मी. (२)
आवडले नाही पालन,
करणे जुन्या रूढीचे.
खरा नास्तिक ठरलो,
त्यांच्यासाठी विद्रोही मी. (३)
माझं मलाच कळेना,
विद्रोही का ठरलो मी?
सत्य धरून चालत,
असताना विद्रोही मी. (४)
टाका काढून बाहेर,
समाजातुन मजशी.
फिरणार नाही मागे,
परतुन विद्रोही मी. (५)
नाद सोडा माझा माझे,
कर्तव्य करणारच.
झेलण्यास संकटाला,
पात्र झालो विद्रोही मी. (६)
ऐतिहासीक नोंदीत,
योगदान विद्रोहींचे.
मूल्य वाढविते झालो,
म्हणून विद्रोही मी. (७)
*डॉ.श्री. बालाजी राजुरकर*
*हिंगणघाट, वर्धा*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💥🔥💥➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*विद्रोही मी*
स्पष्ट बोलणे स्वभाव माझा
आच पेच नसे मनी
समाजाला रूचते कुठे
ठरले मग विद्रोही मी…
खरे बोलणे पचे न कोणा
असत्याला दूर लोटूनी
गप्प बसणे मला जमेना
ठरले मग विद्रोही मी…
खोटे वर्णन केले न कधी
समोरच्याचे मन समजूनी
विचारता दाखवल्या त्रुटी कधी
ठरले मग विद्रोही मी…
हास्य खोटे नसे तनूवर
भाव सजवला सत्यानी
सहज ओळखता त्रयस्थाने
ठरले मग विद्रोही मी…
हृदयी तेच बोल जिव्हेवर
प्रामाणिक सजलेली वाणी
नाक मुरडती मग समाज जन
ठरले मग विद्रोही मी…
मी अशी मी तशी
एकच माझी करणी वर्तनी
निर्भय मी वाटो कोणा काहीही
ठरले मग विद्रोही मी…
बोलत असतील मागे कोणी
समोर दुषणाची नसे हिंमत ही
मी माझ्यातच आनंदी असे
ठरले मग विद्रोही मी….
हा जी, हा जी करत चलने
जमले न स्वार्थासाठी कधीही
गेले निसटून पद प्रतिष्ठा अन्
ठरले मग विद्रोही मी…
*शर्मिला देशमुख -घुमरे, बीड*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💥🔥💥➿➿➿➿
*विद्रोही मी*
विद्रोही मी आगगोळा,
विद्रोह पेटला ह्रदयात।
विझणार नाही आता,
उरल्या माझ्या आयुष्यात।।
अन्याय अत्याचार हा,
फोफावला सभोवती।
सारेच वागतात ईथे,
विसरूनी नातीगोती।।
स्वातंत्र्य समता बंधुतेला,
बंदिस्त बांधून का ठेवले।
संविधानाला मुजोरांनी,
अन कट्टरवाद्यांनी घेरले।।
न्यायाच्या न्यायमंदिरात,
पाणी निर्मळ वाहात नाही।
मनुवादी फासलेले वंगण,
अजून अंगांचे जात नाही।।
शांतीसाठी केली कोणी ,
आताच ईथे ही युध्दबंदी।
बुध्दाच्याच मायभूमीत ,
बुध्दाला करून नाकाबंदी।।
वंचित उपेक्षित शोषिताचे,
कल्याण दिसत कुठे आहे।
जातीपाती धर्माचेच द्रुष्ट,
त्सुनामी वादळ वारे वाहे।।
बुद्ध फुले आंबेडकरांचे,
अनुसरुनी संस्कार धडे।
मी चंद्रावर जाऊन आलो,
आता निघालो सूर्याकडे।।
मलाही मुक्तीच पाहिजे ,
मुक्त होतो या वैफल्यातुन।
वेदनांची राख करतोय,
मी सन्मार्गाच्या वाटेतुन।।
*गोवर्धन तेलंग*
*पांढरकवडा*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💥🔥💥➿➿➿➿
*विद्रोही मी*
धर्मांधतेच्या नावाखाली
खेळले जाते राजकारण
होरपळून निघते भोळी जनता
वाटयाला त्यांच्या येते मरण ॥
वीतभर पोट भरण्यासाठी
चाललीय वणवण भटकंती
महागाईच्या भस्मासूराने
गुन्हेगारी फोफावती ॥
कर्मचाऱ्यांचे तेच हाल
पेंशनविना झाले बेहाल
कास्तकार झालाय हवालदिल
शिक्षण क्षेत्राचीही येते कीव ॥
दुकान मांडून बसलेत सगळे
राजकारणातले पांढरे बगळे
कोणीही येवोत घडेना वेगळे
लोकशाहीतले चित्र आगळे ॥
कुणी म्हणोत मुजोर मजला
मत परखड मांडणार मी
अन्यायाला वाचा फोडण्यास
बनणार आज विद्रोही मी ॥
*सौ. सरला टाले राळेगाव यवतमाळ*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💥🔥💥➿➿➿➿
*विद्रोही मी*
सख्या जरी तू विद्रोही असला तरी
मात्र मी विद्रोही अजिबात नाही
तू केला जुलूम सर्वांवर जरी
तुला मी बोलत मात्र नाही काही….
किती दिवस चालेल तुझी दांडगाई
मी त्याला सामोरी जाईन आनंदात
तुझा हेतू सफल होऊ देणार नाही
तुझ्याबद्दल प्रेम निर्माण करणार मनामनात…
विद्रोही कविता करतोस,लेख लिहितोस
जरा प्रेमाच्या पण कविता लिही
जनमानसात प्रेमाची बरसातही कर
वसुधा तुझ्या प्रेमाची बरसात हर्षाने पाही….
*वसुधा वैभव नाईक*
*धनकवडी,जिल्हा – पुणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💥🔥💥➿➿➿➿
*मी विद्रोही आहे*
हो! विद्रोही मी आहे
सर्वास एकसमान पाहे
समाजात उच्चनीचता
दलितांचा द्वेष करता
हो! विद्रोही मी आहे
जातीभेदाचा तिरस्कार करतो
प्रत्येकास सन्मान देतो
दलितांचे दुःख जाणून घेतो
हो! विद्रोही मी आहे
आंबेडकरी विचारांना कमी लेखता
संविधान शिकवते समता, बंधुता
सर्व जातीधर्मीय समान एकता
हो! विद्रोही मी आहे
आंतरजाती विवाह का नाकारता
प्रेमींना तुम्ही जिवे मारता
हा भेद कशासाठी करता
हो! विद्रोही मी आहे
भटक्या विमुक्तांची मी भाषा आहे
साहित्यात हा विद्रोह मांडत आहे
ईथल्या व्यवस्थेला भांडत आहे
हो! हो! हो! विद्रोही मी आहे….
*सौ. सुरेखा रा.चित्ते*
*श्रीवर्धन जि. रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿💥🔥💥➿➿➿➿
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन* 🌺
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖



