मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते “भ्रमभंग” चे प्रकाशन
नागपूर शहर प्रतिनिधी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते “भ्रमभंग” चे प्रकाशन
वास्तवाला भिडणारं विचारप्रवर्तक पुस्तक वाचकांसाठी उपलब्ध – लेखक उदय तिमांडे
नागपूर शहर प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज मिडीया
नागपूर : (दि २३) समाजात प्रचलित असलेल्या अनेक समजुती, भीती आणि मानसिक बंधनांना थेट प्रश्न विचारणारं “भ्रमभंग” हे पुस्तक नुकतंच वाचकांच्या भेटीला आलं आहे. या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.
लेखक उदय तिमांडे यांनी आपल्या दैनंदिन जीवनातील गोंधळ, समाजातील चुकीच्या समजुती आणि मनावर बिंबलेल्या भीतींचा सखोल अभ्यास करून हे पुस्तक लिहिले आहे. “आपण जसं आयुष्य जगतोय, ते खरंच आपल्या निर्णयांवर चालतंय का? की आपण नकळत इतरांच्या अपेक्षांमध्ये अडकून जगतोय?” अशा मूलभूत प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न या पुस्तकातून करण्यात आला आहे.
“भ्रमभंग” हे पुस्तक केवळ वाचण्यासाठी नाही, तर विचार बदलण्यासाठी आणि स्वतःकडे नव्या दृष्टीने पाहण्यासाठी मार्गदर्शक ठरतं. प्रत्येक धड्यातील वास्तवातील उदाहरणे, थेट संवाद शैली आणि वाचकाला विचार करायला भाग पाडणारे मुद्दे मांडले आहेत, ज्यामुळे हे पुस्तक सर्व वयोगटातील वाचकांसाठी उपयुक्त ठरते. हे पुस्तक ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर amzon, गुगल बुक, कॅमेल, फ्लिपकार्ट साईड वर विक्रीसाठी उपलब्ध आहे. एकदा तरी भ्रमभंग वाचून स्वतःच्या विचारांना नवी दिशा द्यावी, असे आवाहन लेखकांनी केले आहे.



