Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भसाहित्यगंध

बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धेतील विजेत्यांच्या रचना

मुख्य संपादक राहुल पाटील

0 4 8 2 9 3

*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ कविता स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट दहा🎗🎗🎗*

*🥀विषय : आयुष्य हे🥀*
*🍂बुधवार : ०४/ फेब्रुवारी /२०२६*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*आयुष्य हे*

आयुष्य हे आपले,सारे जगून घेऊ।
माणूस माणसाचे,नाते जपून घेऊ।।

सत्कर्म सदा करु,बागेत जीवनी या।
सुगंधित फुलांनी , या बहरुन घेऊ।।

आचार शुध्द ठेवू,विचार शुध्द ठेवू।
राग ईर्षा मनातली झटकून घेऊ।।

सुख दुःखात कधी,भारवू खचू नये।
स्थितप्रज्ञ संयमी , उरी करुन घेऊ।।

प्रवासात येतील ,संकटे अडथळे।
क्षणभर थांबून , थोडं वळून घेऊ।।

सुंदर जीवनाला,रंगवू छान आता।
हिरवा निळा केसरी मिळवून घेऊ।।

भेटत जा नव्याने,टाळू नकोस कधी।
डोळे भरून दोघे , रोज बघून घेऊ ।।

*गोवर्धन तेलंग*
*पांढरकवडा.जि ,यवतमाळ*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✨🌹✨➿➿➿➿
*आयुष्य हे*

आयुष्य हे कोडं
सुटता सुटेना
त्यातील प्रश्नांना
उत्तरे सुचेना

अनुभव पाटी
गिरवित पुढे
वाटचाल सुरु
परि मन कुढे

एकदा मिळते
आयुष्य अमोल
कुढत कंठणे
विचार तो फोल

स्वच्छंदी जीवन
सुख समाधान
अंतरी शोधून
जगू आता छान

*सौ. रजनी भागवत.*
*ऐरोली, ठाणे*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✨🌹✨➿➿➿➿
*आयुष्य हे*

आयुष्य हे,असते
प्रारब्धाचा साठा
फुलांसहीत वाटेत
कधी असतो काटा..!

सुखदुःखाचे वाहती
जीवनी सतत वारे
परीक्षा घेण्या येतात
संघर्षमयी क्षण सारे..!

धैर्याने जात रहावे
आपण सामोरे सदा
यश -अपयश दोन्ही
स्थिर ना राही कदा…!

प्रारब्ध दोष देऊन
निष्क्रीय होऊ नये
आत्मचिंतन करीत
जगावे आयुष्य हे…!

संघर्षाने मिळे बळ
सोसावी कधी कळ
हार मानून नैराश्याला
कधी काढू नये पळ..!

जितके दिले विधात्याने
आयुष्य हे सत्कर्मात जावे
नाण्याला असती बाजू दोन
सकारात्मक बाजूस पहावे..!

*सौ.संध्या मनोज पाटील अंकलेश्वर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✨🌹✨➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य प्रशासक राहुल पाटील 7385363088 वर यांना ४.०० पूर्वी पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*आयुष्य हे*

प्रत्येकाचे
आयुष्य हे
कुणाचे छोटे
तर कुणाचे मोठे
कधी नदीचा संथ प्रवाह
कधी सागरी लाटा
कधी सुखदुःखाचा
आलेला ज्वारभाटा
कुणी म्हणे प्रारब्ध
कुणी म्हणती कर्म
कोणाला कळाले हो?
या आयुष्याचे मर्म
कठपुतलीचा खेळ हा
देवाच्या हातात दोरी
कोणाची चालली हो
इथे शिरजोरी
नको फळाची आशा
कर्म आपले करावे
मरावे परी
कीर्तिरूपी उरावे
आयुष्य हे….

*डॉ. संजय भानुदास पाचभाई नागपूर*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✨🌹✨➿➿➿➿
*आयुष्य हे*

आयुष्य हे अळवावरचे पाणी
तरी जगावे गात गोडशी गाणी
विसरून जाऊ कटू त्या आठवणी
मन तळ्यात जपू आठव आरस्पानी

सुखदु:खाचा खेळच जीवनी
निर्भयतेने संकटासी भिडूनी
सदा सर्वदा हसतची राहूनी
छेडत राहू सुरमयी रागिणी

नात्यांचा इथे असे गोडवा
कधी कटुता आणि दुरावा
तरी प्रसंगी हार मानूनी
गुंता नात्यांचा गोडीने सोडवा

आपण असू कळसूत्री बाहुल्या
सूत्रधार असे तो जगन्नियंता
कर्तव्य करावे अपेक्षा विरहित
भवसागर हाची पार करता

इथले आपण असतो पाहुणे
जाणून घे तू हेची मानवा
प्रेमाने जिंकावे सारे अंतर
विश्वशांती मंत्र सदा स्मरावा

*वृंदा(चित्रा)करमरकर*
*मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक*
*सांगली जिल्हा सांगली*
*©मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✨🌹✨➿➿➿➿
*आयुष्य हे*

आयुष्य हे मिळालेलं
एक सुंदर वरदान आहे
जिवितकर्तव्य पार पाडतांना
देवाने सोडलेलं फर्मान आहे ॥

आयुष्य म्हणजे प्रश्नांचा
एक जिवंत प्रवास आहे
पावलागणिक थांबणारा
अन् पुढे ढकलणारा श्वास आहे ॥

स्वप्नाचं ओझं वाहतांना
कधी ओझंच स्वप्न बनून जातं
सुख दुःखाच्या उन सावलीत
आशेचं बीज रुजतं ॥

आयुष्याच्या अनुभवातून
वेळ शिकविते शांत राहणं
केवळ जिंकणं म्हणजे जगणं नव्हे
तर हरतांना दुसऱ्यास जिंकवणं ॥

आयुष्य हे वेदनेतही
खूप काही शिकवून जातं
सकारात्मकतेने पाहिले तर
आनंद दिल्यास प्रेम मिळतं ॥

*सौ सरला टाले राळेगाव यवतमाळ*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✨🌹✨➿➿➿➿
*आयुष्य हे*

आयुष्य हे
एकट्याने जगायचे
बाकाप्रसंगास
सामोरे जायचे

आयुष्य हे
भरते सुखदुःखाचे
शोकमग्न होऊन
नाही खचायचे

आयुष्य हे
गीत जीवनभराचे
बेभान होऊन
सुरात गायचे

आयुष्य हे
कर्म धर्म कीर्तीचे
जीवनांत होताना
उरेेल स्मृतीचे

आयुष्य हे
अनंत आव्हानाचे
असते आपल्या
अग्निपरीक्षेचे

*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✨🌹✨➿➿➿➿
*आयुष्य हे*

लाभले आयुष्य जितके
जगायचे असे भरभरून
चिंता उद्याची आजला
फायदा आहे का करून?

आलेले जे जे वाट्याला
सुख असो वा दुःख जरी
गोड मानून घ्यायचे आहे
दोष कुणाला द्यावा तरी?

आपल्याच कर्माचे भोग
वा लाभ कार्याचे फलीत
समजून घ्यायचे आपण
ठेवून लाभलेले ते गुपित

ना दोष द्यायचा कुणाला
कारणीभूत हो स्वतःला
बरे वाईट घडले तरीपण
स्वीकार करावे प्रसंगाला

आयुष्य हे असंच काहीसं
जिम्मेदारीचं ओझं पेलून
जगायचं स्वच्छंदी होऊन
मृत्यू ही म्हणेल घे जगून

*बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✨🌹✨➿➿➿➿
*आयुष्य हे*

लाभलेल्या जीवनाचे,
व्हावे फलित सत्कर्मी…
कर्तव्याच्या अनुषंगी,
माणुसकी लाभो धर्मी…१

भले बुरे क्षण येती,
घ्यावे स्वानंदे जगूनी…
दुःखातही सुखाचीही,
अनुभूती घ्या भोगूनी…२

भोग आपुल्या कर्माचे,
देती दोष या फलित…
जैसे कर्म तैसे फळ,
जावे लागते सोशीत…३

ज्यांना कळला जीवार्थ,
कर्म त्यांचे सदगुणी…
घालू नका फुकट हा,
अनमोल देह कुणी…४

उगा आयुष्य न व्हावे,
बदनाम विनाठायी…
समाजाच्या उद्धारास,
लढा विवेक लढाई…५

थोडं जरी *आयुष्य हे*,
यावे समाजाच्या कामी…
*सुधाकरा* कर्माचीचंं,
उरे शिल्लक कहाणी…६

*सुधाकर भगवानजी भुरके*
*आर्य नगर नागपूर*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✨🌹✨➿➿➿➿
*आयुष्य हे*

आयुष्य हे वाटे जणूकाय
अंगणातील सुंदर रांगोळी
एका दिवसासाठी तरीही
सुबक ठिपक्यांच्या ओळी…!!

आयुष्य हे वाटे कधीकधी
काट्यात फुलणारा गुलाब
प्रेतावरती वा देवाचरणीही
जगण्याचा सारखाच रुबाब…!!

आयुष्य हे वाटते दुःखमय
काळजातले जातात सोडून
डोळ्यातही अश्रुंचा दुष्काळ
कोरडे एकदिवस रडूनरडून…!!

आयुष्य हे वाटते क्षणभंगूर
पाण्यावरचा बुडबुडा जसा
जन्म मृत्यू हे श्वासाचे अंतर
मृत्यू येईल कुठं आणि कसा…??

आयुष्य हे कैक जन्माचे पुण्य
आनंदाचे क्षण वाट्याला जेव्हा
नित्य थोडेतरी सत्कर्म केल्याने
होईल शेवट जन्माचा गोड तेव्हा…!!

*राजश्री मिसाळ ढाकणे बीड*
*शिक्षिका, कवयित्री, हायकूकारा*
*©सदस्या – मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✨🌹✨➿➿➿➿

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖

*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन* 🌺
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏

➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे