Breaking
ई-पेपरक्रिडा व मनोरंजनछत्रपती संभाजी नगरपश्चिम महाराष्ट्रपुणे

छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार २०२५ : वैजापूरमध्ये होणार भव्य सोहळा

वैजापूर छत्रपती संभाजीनगर प्रमुख पाहुणे- सौ. वसुधा वै. नाईक

0 4 8 2 9 7

छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार २०२५ : वैजापूरमध्ये होणार भव्य सोहळा

वैजापूर छत्रपती संभाजीनगर
प्रमुख पाहुणे- सौ. वसुधा वै. नाईक

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्वितीय कार्याची गाथा समाजात सतत प्रेरणा देणारी ठरली आहे. त्यांच्या शौर्य, पराक्रम व आदर्शातून प्रेरणा घेऊन समाजाच्या विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यासाठी जिजाऊ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, नागमठाण (ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) तर्फे “छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार २०२५” या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा येत्या रविवारी दि. ७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता मातोश्री हॉल,लासूर हायवे कांदा मार्केट जवळ, वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न होणार आहे.

प्रेरणादायी पुरस्कार सोहळा
या पुरस्कार सोहळ्याद्वारे समाजसेवा, शिक्षण, साहित्य, कला, अभिनय, गडसंवर्धन, समाजजागृती अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान केला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शातून समाजाला योग्य दिशा देणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देऊन गौरविले जाते. यामुळे तरुण पिढीला प्रेरणा मिळावी हा संस्थेचा उद्देश आहे.
प्रमुख अतिथींची मान्यवर उपस्थिती
या वर्षीच्या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून मा. सौ. वसुधा वैभव नाईक (लेखिका, कवयित्री, समाजसेविका, उपक्रमशील शिक्षिका, युवा क्रांती महाराष्ट्र राज्य महिला प्रदेशाध्यक्षा, पुणे)मा. क्रांती श्रीराम बोधले (अध्यक्ष, श्री शंभुराजे राज्याभिषेक ट्रस्ट, पुणे; अध्यक्ष, गडसंवर्धन)
मा. सौ. शोभा महाजन (समाजसेविका, कोल्हापूर)
मा. श्री. बाजीराव बापूराव घोरपडे (आदर्श शिक्षक, श्रीमती गिताबाई मुकनदास बंव प्राथमिक शाळा, दौड)
मा. श्री. आशुतोष अभिजीत संकाये पाटील (अभिनेता, झी क्लासिक टीव्ही, ‘किलर स्टार रिअॅलिटी शो फेम-५’) मा. श्री. मुरलीधर मारोती बेडगे (संस्थापक अध्यक्ष – स्वराज्य देशा, महाराष्ट्र राज्य; महाराष्ट्र चित्रपट महामंडळ शहरप्रमुख, छत्रपती संभाजीनगर; बी.के.टी. मॅनेजर, वृक्ष संवर्धन फाऊंडेशन समिती सदस्य) युवा प्रमुख म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या सोहळ्याचे सूत्रसंचालन मा. श्री. धोंडीरामसिंह राजपूत (गटशिक्षणाधिकारी, न.प. वैजापूर; पत्रकार, चालकवि, लेखक) करणार असून, सोहळ्याचे आयोजन मा. श्री. अॅड. धनराज अंभोरे (अध्यक्ष, जिजाऊ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, नागमठाण) व मा. श्री. संतोष नामदेव दौडे (सचिव, जिजाऊ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, नागमठाण) यांनी केले आहे.

आयोजक मा. श्री. सुर्यकांत रामदास पाटील मोटे (पोलीस पाटील, गोयगाव; सचिव – म.रा.गा.का. पोलीस पाटील संघ, जिल्हा सचिव, छत्रपती संभाजीनगर) हे सहआयोजक म्हणून कार्यरत आहेत.

नागरिकांना आवाहन

संस्थेतर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, आपण सहकुटुंब-सहपरिवार या भव्य सोहळ्यास उपस्थित राहावे, मान्यवरांचा गौरव समारंभ साक्षीदार व्हावे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे