
0
5
9
0
3
4
प्रतीक्षा संपली
प्रतीक्षा संपली रं देवा..
लई उपकार झालेत तुझे..
बिचारी ती धरणी मायच
अश्रू गिळत होती रं माझे..
किती भाव खातोस रं बाबा
असा काय गुन्हा आम्ही करतो
तुझ्याच भरवश्यावर असते जगणे
बरं दिसतंय का तुला असे वागणे..
जगाचा पोशिंदा म्हणे आम्ही
मंग फासावर का चढावे लागते
तुझा हलगर्जीपणा नडतो आणि
सरकार बी निष्ठूर होऊन वागते..
कर्जबाजारी बुडतो शेतकरी
तू बी काय कमी जीव घेतो
कधी अंगावरचं कापडही भिजेना
अन् मोत्याचं पिकही वाहून नेतो..
आता जरी प्रतीक्षा संपली पण
अजून लई गड जिंकायचा आहे..
दमादमानं बरसू दे ही आभाळमाया
अजून सपान सारं फुलायचं आहे..
अजून सपान सारं फुलायचं आहे..
संध्या मनोज पाटील
अंकलेश्वर, गुजरात
=========
0
5
9
0
3
4



