Breaking
ई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूरपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रपुणेसाहित्यगंध

लेखन कौशल्य….!!

वसुधा वैभव नाईक

0 4 8 3 0 0

लेखन कौशल्य….!!

लेखन कौशल्य म्हणजे आपले विचार आणि आपल्या कल्पना लिखित शब्दांमध्ये व्यक्त करण्यासाठी पुरेसे ज्ञान असणे होय. ‘मराठी भाषा’ जशी वळवावी तशी वळते. ही भाषा रमणीय आहे. आपल्या मराठी भाषेत खूप गोडवा आहे. मराठी भाषेची महती मोठी आहे. मराठी भाषेचे सौंदर्य मनाला आनंद देते. ही राजभाषा आहे. लेखन कौशल्य प्राप्त करताना प्रथम आपण स्ट्रोक्स याकडे लक्ष द्यावे. हे स्ट्रोक्स कुठले तर आपण लहान मुलांना तिरप्या रेघा ,सरळ रेघा वर्तुळाकार रेघा,अर्धवर्तुळाकार रेघा यांचा समावेश करून घेतो. इथूनच माणसाच्या लेखनाला सुरुवात होते. कोणतेही कौशल्य प्राप्त करताना ते टप्प्याटप्प्याने प्राप्त होते.

श्री शिवाजीराव भोसले आपल्या भाषणामध्ये म्हणायचे नेहमी की, ” लेखन ही एक अक्षर क्रीडा आहे ती आनंदाने करता यायला हवी “. प्रत्येक मराठी भाषकांवर श्री शिवाजीराव भोसले यांचा विचारांचा पगडा दिसून येतो. लेखनाला सुरुवात होते ती हस्ताक्षर, शुद्धलेखन यापासून होते. शिक्षक म्हणतात बघा ‘छान लिहिलेस तू.’ या छान शब्दांपासून ते वळणदार शब्दांपर्यंत लेखन उत्तम करता येण्याचे नियम म्हणजेच स्ट्रोक्स यांचा अतिशय महत्त्वाचा वापर आहे. शुद्धलेखनाच्या नियमाप्रमाणे जर का आपण लेखन केले तर ते वाचणाऱ्याच्या मनावर राज्य करते. शुद्धलेखन बिनचूक असल्याने दिसायला डोळ्याला खूप छान दिसते. काही शब्द असे असतात की आपल्याला डोळ्याला पाहून करतात की हे शुद्धलेखन बरोबर नाही. हेच शुद्धलेखन मग आपल्या आत्मविकासासाठी उपयोगी पडते.

मग अगदी बालवर्गातील लहान मुलांच्या रोजच्या वहीतल्या लेखनाचे अक्षर असो किंवा कोणी साहेबांना लिहिलेले पत्र असो शुद्धलेखनाचा व चांगला आकाराचा विशेष प्रभाव इथे पडत असतो. भाषा विकासासाठी आपण लेखन कौशल्यांचा वापर निश्चितच करतो. या लेखनात इतरांचे व वाङमयीन साहित्य असते. आपल्या विचारात आणि लेखणीत खूप सामर्थ्य लपलेले आहे. आपल्या लेखणी पासून आपण समाज प्रबोधनही करू शकतो. आपल्या लेखांमधून आपण विचार मांडून इतरांची विचारशृंखला बदलण्याची ताकद आपल्या लेखणीत असते.

मराठी भाषेत विरामचिन्हांचा वापर आवश्यक आहे. विरामचिन्हांचा वापर केल्या नंतर आपण वाचन त्याप्रमाणे करणे अपेक्षित असते. वाचन करणे सोपे जाते. अलंकारिक शब्दांचा वापर केल्यानंतर ते मराठी भाषेचे आकर्षण ठरते. लेखन करताना आपल्या लेखनामध्ये काही चिन्हे वापरायचे असतील किंवा काही चित्र वापरायचे असतील तर आपण त्यांना वेगवेगळ्या रंगात रंगवावे. वाचन करताना पटकन ते लक्षात येते. एखादे फळ घेतले तर, त्या फळाची चव, रंग,वास, इत्यादी मनातून येणारे शब्द लिहिले असता शब्दसाठा अमाप होतो. शब्दसंपत्तीत भर पडते. कोणतेही लेखन करताना मुद्देसूद करावे. वाचताना एकाग्रता निर्माण होते. पुढे काय लिहिले आहे याची ओढ लागते.

वसुधा वैभव नाईक
धनकवडी, जिल्हा -पुणे
========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 3 0 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे