Breaking
ई-पेपरकविताछत्रपती संभाजी नगरनागपूरमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

मोगरा

विष्णू संकपाळ बजाजनगर

0 4 8 2 9 3

मोगरा

तुझ्या केसामुळेच तर 
खुलून दिसतोय गजरा
मनात जळतोय गुलाब
धन्य धन्य झाला मोगरा… //

लांबसडक गर्द केसांचा
कसा वर्णावा हा नजारा
सळसळती नागीण की
खळखळती जलधारा.. //

पाठीवर रूळतोय जणू
मृदु मुलायम रेशमसाज
आणि त्यावर मिरवतोय
शुभ्र मोगरा गंधीत गाज.. //

तू जेव्हा नाजूक मानेला
देतेस डौलदार झटका
मग मोगर्‍याच्या मनात
तेव्हा होत असेल गलका.. //

केसांनी मोगर्‍याला की
मोगर्‍याने केसांना दिला
सुगंध कुणाचा कुणाला
हाच प्रश्न पडतोय मला.. //

विष्णू संकपाळ बजाजनगर
छ. संभाजीनगर
=========ञ

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे