राष्ट्रीय महामार्गावरील यमसदनी खड्डे नवतरुणांनी बुजविले.
मानोरा येथील नवतरुणांनी घेतला समाज बांधिलकीचा वसा
राष्ट्रीय महामार्गावरील यमसदनी खड्डे नवतरुणांनी बुजविले.
मानोरा येथील नवतरुणांनी घेतला समाज बांधिलकीचा वसा
मालेवाडा/कारगाव
उमरेड -भिवापूर राष्ट्रीय महामार्ग वरील खड्ड्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढतच आहे. उमरेड ते भिवापूर महामार्गाची दयनीय अवस्था झाली आहे. अनेकांना यात आपले प्राण गमवावे लागले आहे. याच खड्ड्यामुळे उमरेड येथील आंबेडकर लेआउट मधील सचिन पाटील (वय३८) याचा 18 सप्टेंबरला सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास मानोरा फाटा शिवारात राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यात दुचाकी घुसल्याने दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला होता. त्याची दखल घेत गावकऱ्यांनी मानोरा येथील तरुणांनी खड्डे बुजविण्याचा सामूहिक उपक्रम राबवला.
नागपूर ते गडचिरोली राष्ट्रीय मार्गावरील भरधाव वेगाने वाहने जात असतात. याच मार्गावर अनेक खड्डे असल्यामुळे अपघाताची सीमा लांबली आहे. अनेक गंभीर अपघात या खड्ड्यांमुळे पाहायला मिळाले आहे. अनेकजण आपली दुचाकी घेऊन जीव मुठीत धरून वाहनाने प्रवास करतात. याच राष्ट्रीय महामार्गावर माजी सभापती कृष्णाजी घोडेस्वार यांचा सुद्धा काही दिवसापूर्वी अपघात झाला होता. त्यात त्यांना किरकोळ दुखापत झाली होती.
अशाच गंभीर परिस्थितीची जाण घेऊन मानोरा येथील नवतरुण युवकांनी सामूहिक रित्या समाजाची बांधिलकी जोपासत या रस्त्याचे खड्डे सरकारकडून डागडुजी होत नसल्याची खंत बाळगता, नवयुवकांनी पुढे येत रस्त्यावरील खड्डे सामूहिकरित्या स्व: कष्टाने परिश्रम घेत बुजविले. यावेळी नवयुकांमध्ये सरकार प्रति संताप व्यक्त केला होता. मात्र समाज बांधिलकीची जाण घेत कार्य केल्याचा आनंद नवतरुणांच्या चेहऱ्यावर झळकत होता.
यावेळी विकास ठाकरे, कृष्णा जूनेदार, अमित ठाकरे, गोपाल अलबनकर, योगेश कुंबरे , लंकेश सोनटक्के ,लोकेश ठाकरे, अविनाश ठाकरे ,शुभम भोयर या नवतरुणांनी रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी अथक परिश्रम घेतले.
“प्रतिक्रिया”
या राष्ट्रीय महामार्गावर अनेक अपघात पाहायला मिळाले. अपघाताची सीमा लांबणीवरच आहे. असेच अपघात होत राहतील तर स्थानिक प्रशासन कोणत्या कामाचे आहे
माजी सभापती भिवापूर कृष्णाजी घोडेस्वार.





