जे. एस. एम. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
जे. एस. एम. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
अलिबाग (दि २४) (रायगड) दिनांक २४ सप्टेंबर २०२५ रोजी जे. एस. एम. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्सहात साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सोनाली पाटील, उप-प्राचार्य व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रविण गायकवाड, प्रा. अश्विनी आठवले, डॉ. पंकज घरत, प्रा. अदिती दामले व एन. एस. एस. स्वयंसेवक उपस्थित होते.
जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. Adv. गौतमभाई पाटील यांनी एन. एस. एस. डे निमित्त सर्व विदयार्थ्यांना व शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या सुरवातीला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सोनाली पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले कि, राष्ट्रीय सेवा योजना विभाग हे विदयार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकासाचे एक उत्तम माध्यम आहे. त्यामुळे सर्व विदयार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विविध उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा असे प्राचार्या डॉ. सोनाली पाटील यांनी सांगितले.
उप-प्राचार्य व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रविण गायकवाड यांनी आपल्या मनोगतात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्थापनेची पार्श्वभूमी सांगितली. तसेच राष्ट्रीय सेवा योजनेची उद्धीष्ट्ये, ब्रीदवाक्य, बोधचिन्ह, कार्यप्रणाली, नियमित उपक्रम, श्रामसंस्कार शिबिर व विविध जिल्हा स्तरीय, राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील शिबीरांची माहिती डॉ. प्रविण गायकवाड यांनी दिली.
प्रा. अश्विनी आठवले व डॉ. पंकज घरत यांनी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी म्हणून काम करत असताना आलेले अनुभव सांगितले व विदयार्थ्यांनी विविध कार्यक्रम व उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. अश्विनी आठवले यांनी केले.





