ई-पेपरकोकणछत्रपती संभाजी नगर
भीम बाळ
0
4
8
2
9
3
भीम बाळ
होता एकच, भीम बाळ
जगात फारच हुशार,
शाळेबाहेर बसून शिकला
पण झाला तो, बॅरिस्टर.
पुस्तक मित्रांच्या सोबतीने
शिकला, रात्रं दिवस,
उपाशी पोटी,जरी राहीला
पण सोडला नाही अभ्यास.
डॉ. आंबेडकरांनीं जग दिपवले
लिहले देशाचे,सं विधान,
आनले, लोकांचे राज्य
लोकशाहीला दिला मान.
शिकून सवरून, मोठा हो
नाव कमव कुळाचे,
भिम बाळ, ज्ञानाचे प्रतीक
स्मरण कर, त्यांच्या त्यागाचे.
अन्यायाच्या, तो कर्दनकाळ
भीमाई रामजींचा, बाळ,
पाण्यालाच आग लावून
केलं खुलं,चवदार तळं.
भारतदेशाचे, लिहून संविधान
खऱ्या अर्थाने देश प्रजासत्ताक केला,
घालवली,पिढ्यानु, पिढ्याचीगुलामगिरी
लोकशाहीचा अवलंब झाला.
आज झाले विश्व नतमस्तक
झाला झाला भीम जय घोष,
त्यांच्या कार्याची थोरवी लिहण्या
कमीच पडतील विश्व कोष.
मायादेवी गायकवाड/ठोकळ
ता.मानवत,जि.परभणी
0
4
8
2
9
3



