आरोग्य व शिक्षणई-पेपरकवितानागपूरपरभणीमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध
नापास झालो तर
मायादेवी गायकवाड ठोकळ
0
4
8
2
9
4
नापास झालो तर
जर,नापास झालो तर
मी,रडणार नाही,
त्याचे कारण शोधीन
तोंड मात्र लपवणार नाही.
अपयशाचे चिंतन करीन
खचणार,तर मुळीच नाही,
मित्र खुशीत सामील होईन
दुःखाची झळ लागू देणार नाही.
कोठे कमी पडलो तेथून
सुरुवात मात्र मी करीन,
मागचा अनुभव पाठीशी
यशस्वी,मार्गक्रमण करीन.
शून्य तर नाही,नं मी?
मनातून,जरा कचरलो होतो,
जिद्द धरून अभ्यास करीन
दाखवेन,मी हुशार होतो.
झाले होते, चित्त विचलीत
आता आलो,आहे भानावर,
पुन्हा नव्याने सुरवात करीन
घालीन आवर मी, स्वेर मनावर.
मायादेवी गायकवाड ठोकळ
मानवत, जि.परभणी
===========
0
4
8
2
9
4



