अनाकलनीय
आकलनीय तुज मानवा
गूढ निसर्ग नियमांचे
नको त्रासणे तयास
समज तुजसाठी भाग्याचे
आकळावे तव मतीला
म्हणून तयाचा कोप
नसावा हस्तक्षेप तुझा
शक्तीहीन तुझा थोप
घे कितीही उंच उडी
नवनवे तुझे संशोधन
अगणित गूढ उलगडण्या
असशी तू असक्षम
सोडून स्वार्थ सारा
बन निसर्ग रक्षक
नकळत बनशील उगा
प्रकृती चा भक्षक
नच आवडे रे कोणा
जीवनात हस्तक्षेप
अनाकलनीय न हे तुजला
सांभाळून घे झेप
*शर्मिला देशमुख -घुमरे, बीड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*अनाकलनीय*
डोळ्यांच्या तळघरात
अजुनही तेच प्रश्न दडलेले
अनाकलनीय होते
ते सारेच घडलेले
ती पूजा करत होती देवाची
घट्ट डोळे मिटून
कोण गेले असेल
तेव्हाच गळा कापून
प्रश्न अजूनही अनुत्तरीत
ती वात मात्र विझलेली
देवालाही नाही माहीत
योजना ती शिजलेली
ते अनाकलनीय आता
एक रहस्य बनून उरलेलं
आम्हीही मोजतो आहोत
आता आयुष्य हे सरलेलं
*डॉ. संजय भानुदास पाचभाई*
*नागपूर*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*अनाकलनीय*
काही कळण्या आधीच
दरवाजे बंद झाले
कुणाचे वाढले श्वास
कुणाचे मंद झाले
आली कुठून म्हणे ही
जीवघेणी महामारी
फलक लावले गेले
प्रत्येकाच्या दारोदारी
बंद झाले जाणे येणे
बंद झाल्या भेटीगाठी
जपू लागले स्वतःला
ज्यांची वयाची साठी
येता खोकला जरासा
लोकंही टाळू लागली
घरातल्या माणसाना
घरातली छळू लागली
येता समय अंतीचा
कोणी नसे संगतीला
कोण बसावे सांगा
मरणाच्या पंगतीला
अनाकलनीय असे
सारे घडूनिया गेले
कोरोनाच्या महामारीत
मग छळूनिया गेले
*इंदुरवार बी.आर*
*किनवट, जि.नांदेड*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*????कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ३.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰????➰➿➿➿➿
*अनाकलनीय*
निसर्गप्रेमी एक माणूस
झाडांना जीव लावायचा
वृक्षलागवड करून दरसाल
जीवापाड त्यांना जपायचा ॥
वसुधा व्हावी हिरवीगार
म्हणून रात्रंदिन झटायचा
जखम झाली झाडाला की
वेदनेने तो तडफडायचा ॥
बघता बघता वनराई
घनदाट अरण्य भासे
पल्याड जाणारी पाऊलवाट
लांबून पुसटशी दिसे ॥
पशूपक्षी आनंदाने
थयथय नाचायचे
समाधानाचे कारंजे
त्याच्या मनामध्ये उडायचे ॥
अचानक आले चक्रीवादळ
मोठमोठ्या कंपन्यांचे
जिकडे तिकडे फॅड माजले
मोठमोठे मॉल उभारण्याचे ॥
स्वप्नांचा झाला चुराडा
झाडे उन्मळून पडताना
अनाकलनीय बदल पाहून
डोळ्यात अश्रू वाहताना ॥
वसुधाही रुसली अन्
पाणी आटवून बसली
भौतिक सुखाच्या मृगजळाला
भोळी जनता फसली ॥
*सौ सरला टाले, राळेगाव – यवतमाळ*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*अनाकलनीय*
अनाकलनीय प्रीत
त्याला कळली नाही..
नुसती झुरत राहिली
काही बोलली नाही…
जडली होती प्रीत
दडवून ठेवी भावना..
उलगडले ना कोडे
कधी याच्याही मना…
सामोरे यायची पण
तसे बोलली नाही..
हृदयाचा ठाव घेता
गूढ खोलली नाही…
प्रतीक्षा केली तिने
त्याच्या प्रतिसादाची..
सोडली नाही कधी
ती खूणगाठ मनाची…
दीर्घ प्रतीक्षेनंतरच
का कोणास ठाऊक..
बोलून दावली तिने
तोही झाला भाऊक…
प्रेमबंधात अडकता
कोडे उलगडले गेले..
नाते ऋणानूबंधाचे
हळुवार जुळले गेले…
*बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*अनाकलनीय*
मानवी जीवन खरंच एक
न उलगडणारे अनाकलनीय कोडे
जन्म मृत्यूच्या प्रवासात या
दुःख भारी सुख मात्र थोडे
*श्री.पांडुरंग एकनाथ घोलप*
*ता.कर्जत जि.रायगड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*अनाकलनीय*
अनाकलनीय गूढ निसर्गाचे
ना कळले कधी कुणा
छेडू नको तू पुन्हा मानवा
जान तू निसर्ग नियमा
*श्रीमती अस्मिता हत्तीअंबिरे परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*



