Breaking
ई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भ

स्वामीदर्शन मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

रजत डेकाटे, प्रतिनिधी

0 5 9 6 0 8

स्वामीदर्शन मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

रजत डेकाटे, प्रतिनिधी

बिनधास्त वृत्तसेवा नागपूर

नागपूर (दि २२): स्वामीदर्शन महानुभाव मंडळाच्या वतीने महानुभाव पंथातील समाजसुधारक, शिक्षणमहर्षी, मजदूर नेते तथा माजी राज्यसभा खासदार कै. रावसाहेब गं. म. ठवरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आदर्श बालविद्या मंदिर, जुना सुभेदार लेआऊट येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून जवळपास २०ते४० रक्तदात्यांनी रक्तदान केले.

शिबिराच्या उद्घाटकीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परमार्ग साधना आश्रम, मनसरचे संचालक महंत खंदारकर बाबा होते. उद्घाटक म्हणून महानुभाव आश्रम, मनसरचे संचालक महंत विश्वनाथबाबा कपाटे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून NHRCC हॉस्पिटल, नागपूरचे प्रख्यात न्यूरोसर्जन डॉ. विवेक अग्रवाल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर येथील रक्तकेंद्र प्रमुख डॉ. मुकेश वाघमारे, पूर्णा मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्सचे संचालक तथा माजी उपाध्यक्ष, शिवसेना नागपूर जिल्हा अभिषेक देशमुख, नाना ठवरे, आदर्श बालविद्या मंदिरचे संचालक चंद्रकांत जवदंड गुरुजी आणि पूज्य प्रणवदादा खंदारकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

रक्तदान शिबिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर येथील रक्तकेंद्र विभागाच्या पथकाने महत्त्वाची तांत्रिक भूमिका पार पाडली. रक्तदात्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या वतीने प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष मनोज बोरकर यांनी मंडळाच्या वतीने सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र स्वीकारले.

यावेळी महंत खंदारकर बाबा, महंत विश्वनाथ बाबा, डॉ. विवेक अग्रवाल, डॉ. मुकेश वाघमारे, नाना ठवरे, अभिषेक देशमुख, चंद्रकांत जवदंड गुरुजी, राहुल शेंडे आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. त्यांनी रक्तदानाचे महत्त्व विशद करत समाजातील नागरिकांनी नियमित रक्तदानासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष मनोज बोरकर यांनी केले. सूत्रसंचालन केतकी खोब्रागडे यांनी केले, तर अर्चना बारमाटे यांनी आभार मानले.

शिबिराच्या यशस्वीतेसाठी भूपेश शेंडे, राहुल शेंडे, राजेंद्र कपाटे, प्रभाकर चंदनखेडे, देवराव मोटघरे, ताम्रध्वज खोब्रागडे, प्रभाकर बोरकर, गुणवंत रंगारी, बबन डोंगरे, घनश्याम मेश्राम, नामदेव निमगडे, सात्विक भिमटे, नवीन खोब्रागडे, रेषेंद्र उके, रोहित बन्सोड, शंकर तागडे, विकास गजभिये, मंगला, रजनी बागडे, प्रिया शेंडे, आयुषा शेंडे, श्रद्धा बागडे, स्नेहल गजभिये यांच्यासह मंडळाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 9 6 0 8

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे