0
4
8
2
8
6
प्रभातशिल्प
आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती काहीतरी कारणास्तव आलेली असते. या जगात अवास्तव असं काहीच नाही. जे कुणी भेटतं, जिथे कुठे मन रमतं, जिथे आपण मिसळून जातो, त्यांचं काहीतरी देणं लागतो. म्हणून तर आयुष्यात वेगवेगळी लोकं वेगवेगळ्या टप्प्यावर भेटतात, अन् आयुष्य बहरून टाकतात.
==========
सुरवात नेहमीच छोटी करावी, पण शेवट मात्र एक सोहळा बनला पाहिजे. आयुष्यात सावकाश चाला काही हरकत नाही, पण चालताना असं चालायचं की आपल्या कर्तृत्वाची, आणि मनमिळावू स्वभावाची, आत्मिक, समाधान लाभलेल्या मनाची, आणि दैदीप्यमान यशाची सोन पावले सदैव मागे उमटली पाहिजे.
संकलन:उषाताई कोष्टी (बिनवडे)
ता.मंगळवेढा जि.सोलापूर
==========
0
4
8
2
8
6



