Breaking
ई-पेपरकवितानागपूरमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

मन मारूनच ना .?..

सरला टाले

0 4 8 2 9 3

मन मारूनच ना .?..

रोज करतेय साजश्रृंगार
मनात असंख्य विचारांचा भार
एकेका गिऱ्हाईकांची वाट पहात
वर्ष लोटलीत फार ॥

अश्रृ दडवून पापण्यांच्या काजळात
लपवून लज्जेला काळजात
रोज देहाची होतेय बोली
सोडविण्यासाठी मिळेना कोणी वाली ॥

वखवखलेल्या नजरांचा मारा
समाजात मिळेना थारा
अंधारात होतेय विटंबना
जिवनाची चाललीय कुचंबना ॥

तिलाही वाटते मिळावा आधार
उजेडात मात्र प्रतिष्ठीतांचा नकार
मन मारूनच ना … ?
करतेय रोज साजशृंगार ॥

पोटापाण्यासाठी अब्रूचा मांडला बाजार
भारतमातेच्या कुशीत
माताच का बनली लाचार ?
मनाला पडला गहण विचार ॥

सरला टाले
राळेगाव यवतमाळ
=======

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे