Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकवितानागपूरबीडसाहित्यगंध

मंगळवारीय ‘बाल’ काव्यस्पर्धेतील विजेत्यांच्या बालकविता

मुख्य संपादक: राहुल पाटील नागपूर

0 4 8 2 8 4

➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*🔘संकलन,मंगळवारीय ‘बाल’ काव्यस्पर्धा🔘*
➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘मंगळवारीय बालकाव्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट दहा🎗🎗🎗*

*📘स्पर्धेचा विषय : हाताची घडी📘*
*🔸मंगळवार : ०९ / डिसेंबर /२०२५*🔸
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*खालील विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध अंक १९६ साठी लवकर साहित्य पाठवावे.*
♾️♾️♾️♾️💐〽️💐♾️♾️♾️♾️
*हाताची घडी*

शाळेचा पहिला दिवस
गोंधळ झाला सारा
पाठीवर दप्तर तरी
हातात पुस्तकांचा पसारा

सावरून चालता चालता
धपकन पडले खाली
सगळे लागले हसायला
माझ्या रडण्याने भरली खोली

काय झाले म्हणून
गुरुजी आले पळत पळत
मी होते मोठ्याने रडत
आणि मुले होती हसत

गुरुजी आले तरी
वर्ग शांत होईना
काय झाले कसे झाले
गुरुजींना काही समजेना

हाताची घडी तोंडावर बोट
गुरूजी बोलले छडी आपटत
हाताची घडी तर घातली
पण बोटच नव्हते मला सापडत

उचलला पाय अन्
मी लावला तोंडाला
थांबवू शकले नाही
मग कोलांटी उडीला

पुन्हा एकदा झाली
माझी फटफजिती
गुरुजी प्रेमळ माझे
जवळ घेऊन समजावती

*शर्मिला देशमुख -घुमरे, बीड*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️➰🍃➰♾️♾️♾️♾️
*हाताची घडी*

हाताची घडी तुम्ही घाला रे बाळांनो,
छान छान गोष्ट सांगतो,ऐका मुलांनो..

डोळे मिटा हळूच, श्वास घ्या हळूच,
मनातल्या फुलांना,वाऱ्याची झुळूक..

गुरुजी म्हणे शाब्बास,लाडक्या बाळा,
दिसतोय ना तुला,समोरचा तो फळा..

फळ्यावरती पहा,कासव अन् ससा,
ससा गाजर खातो ऐटीत बसून कसा..

कासव मात्र हळूहळू, चालतच राही,
जिंकल्या शिवाय, जीवाला चैन नाही..

हाताची घडी घाला,अन् तोंडावर बोट,
कोल्ह्याची गोष्ट ऐका,व्हाल लोटपोट..

कोल्ह्याची फजिती,झाली मोठी भारी,
घडी सोडून हसली,वर्गातले मुले सारी..

*बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️➰🍃➰♾️♾️♾️♾️
*हाताची घडी*

होत नाही पाठांतर
दंगामस्ती करतो खूप
मग बाई म्हणतात मला
थोडा बस ना रे चूप… //

तोंडावर बोट ठेवून
घाल हाताची घडी
नायतर तुला देईन
त्याच हातावर छडी.. /!

कळत नाही मला
बसायचे कसे गप्प
होतील ना हो माझे
हातपाय सारे ठप्प.. //

मान वळवून हळूच
बघतो इकडे तिकडे
चिंगीही बघत होती
चोरून माझ्याकडे.. //

बोट सुटले गप्पकन
अन् फस्सकन हसलो
पकडले मग बाईंनी
आयताच तिथे फसलो.. //

पाठीत माझ्या दिला
एक धम्मक लाडू
काय सांगू मला
आले ना हो रडू… //

हाताची घडी मग
घातली मी घट्ट
बाई म्हणतात मला
मी अभ्यासात मठ्ठ //

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️➰🍃➰♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ४.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*हाताची घडी*

हाताची घडी तोंडावर बोट
ठेवायला सांगितल मॅडमने
चिडीचूप बसता की देऊ
कल्ला गोष्टी थांबवू छडीने ||

तोंडाला कुलुप लावा
बोलाच नाही आपसात
नोटीस आदेश बजावला
भंग ना हो वर्गाची शिस्त ||

छडी वाजे छमछम छ्मछम
विद्या येई घमघम घमघम
गुरूजी काडी नका मारूजी
झोंबते हात पाठ लाल बम ||

निमूट बसाच रे एकदम
परीक्षा सभा सुरू आहे
गांभिर्य ठेवा पेपर सोडवा
बाग नव्हे ज्ञानमंदिर आहे ||

हाताची घडी मोडली
बघा मग करतो शिक्षा
कोंबडा बन उठबस्या काढ
नको सजा शांत राहू त्यापेक्षा ||

बाई हा बंड मठ्ठ मुलगा
चिडवतो मारतो रोज
झाले का गाऱ्हाणे सांगुन
नविन नाही तक्रारी न्यूज ||

*प.सु.किन्हेकर, वर्धा*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️➰🍃➰♾️♾️♾️♾️
*हाताची घडी*

वर्गात आले मास्तर
मुलांनो हाताची घडी
बोट ठेवा तोंडावर
काढू नका खोडी ॥१॥

आज होती थंडी
अंगात भरली कुडकुडी
मुलांची वळली बोबडी
बंडूने घातली बंडी ॥२॥

लहान त्याची कुडी
मारली मुलांनी उडी
मदतीला आले गडी
घेऊन गेले माडी ॥३॥

केली मुलांनी कडी
सुटली हाताची घडी
ओळखली त्यांची नाडी
मास्तरांनी काढली छडी ॥४॥

चुपचाप बसले सवंगडी
फिरली त्यांची खोपडी
केली त्यांनी कुरघडी
सोडवू लागले कोडी ॥५॥

*श्रीमती नीला पाटणकर,शिकागो*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️➰🍃➰♾️♾️♾️♾️
*हाताची घडी*

गुरुजी आले वर्गात
कुजबुज झाली मुलांत
वर्ग झाला सुरू
प्रश्न लागले विचारू

गोंगाट झाला वर्गात
म्हणाले हाताची घडी
बोट ठेवा तोंडावर
सुरू झाली कुरघडी

मुले मोठे खोडकर
समजावणे नाही सोपस्कार
त्रासून गेला मास्टर
सर्व निघा बाहेर

मुले जोरजोरात हसले
मैदानावर जाऊन बसले
कडाक्याची होती थंडी
सर्वांनी घातली होती बंडी

सर्वांनी केला
हाताची घडी
एकाने काढली नोट
दाखवू लागला बोट

चला गप्प बसा
गुरुजी आले जवळ
बांधा हाताची घडी
सांगतील आम्हाला खेळ

*केवलचंद शहारे*
*सौंदड गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️➰🍃➰♾️♾️♾️♾️
*हाताची घडी*

झाडावर भरली
पक्षांची शाळा
रंगीबेरंगी पंखांनी
फुललाय मळा

माकड होता लपून
शेपटी त्याची दिसली
झाडाच्या खोडावरून
खारूताई हसली

मला व्हायचे गुरुजी
माकडाने घेतली उडी
तू नाही पक्षी
डाव खेळू नको रडी

नदीच्या प्रवाहात
ओंडका येतांना दिसला
होता त्यावर बगळा
अगदी थाटात बसला

गवताच्या कुरणावर
ससोबा होता निजून
हाताची घडी उशाला
थंडीने गेला थिजून

चला रे पळा आता
ही कसली शाळा
पक्ष्यांच्या शाळेत
सर्वच झाले गोळा

*डॉ. संजय भानुदास पाचभाई नागपूर*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️➰🍃➰♾️♾️♾️♾️
*हाताची घडी*

जंगलात भरली प्राण्यांची शाळा
शाळेत झाला, भला मोठा राडा

जो तो म्हणे, मीच आहे गुणी
माझ्यासारखा रानात दुजा ना कुणी

ससा म्हणाला, मी आहे हं चपळ
कासव बोलला, मारेन एकच थापड

हरिण म्हणाली, मीच आहे सुंदर
रागात कुदला, तिच्यावर बंदर

हत्तीने उगारली, हवेत सोंड
रानगवा धावला, फाडून तोंड

कोल्होबाने काढला, कुई कुई गळा
लांडगा ओरडला, पळा रे पळा

जिकडे तिकडे धावाधाव झाली
छडी घेऊन अस्वलबाई आली

एका – एकाला, काढले ठोकून
ओरडली जोरात, पाठीत वाकून

करा हाताची घडी, ठेवा तोंडावर बोट
काढायची नाही, एकमेकात खोट

मोजायचे नाही, कुणाचे दोष
दाखवायचा नाही, रागात जोष

अस्वलबाईचे म्हणने, सर्वांना पटले
गळ्यात गळा घालून, एकमेका भेटले

*सौ वनिता गभणे आसगाव भंडारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️➰🍃➰♾️♾️♾️♾️
*हाताची घडी*

बाबाने दिली
हाताची घडी
दाराला लटकवून
समजलो कडी

घड्याळाचे काटे
फिरतात गोल गोल
रोज मला सांगतात
वेळेचे मोल

घड्याळाचं गणित
मला काही सुटेना
खोड्या केल्याशिवाय
आता मला राहवेना

हळूच दिली मी
घड्याळीला चाबी
ताईला म्हणालो
त्यात आहे खराबी

फिरता फिरता
एक काटा तुटला
हातातून निसटून
काच माझा फुटला

नव्या माझ्या घडीचे
वाजले बारा
अभ्यासाच्या गोंधळात
खेळ संपला सारा

*डॉ.सौ.मंजूषा साखरकर*
*ब्रह्मपुरी जि.चंद्रपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️➰🍃➰♾️♾️♾️♾️
*हाताची घडी*

ऑफिस मधून येईपर्यंत
शुद्धलेखन लिहा
हाताची घडी बडबड नको
मुलांनो शांत रहा.

शुद्धलेखन लिहून झाले
हळूहळू आवाज वाढला
कुणी केल्या खोड्या
कुणी गळा काढला .

गुरुजी येताच वर्गात
पकडले आपापले बाक
गुरुजींचा चढला पारा
म्हणे एवढा नाही धाक.

बंड्या आण तुझी वही
नाही लिहिले गुरुजी
हाताची घडी तोंडावर बोट
कसे लिहिणार गुरुजी.

उलट उत्तरे देतो
घे हातावर छडी
हाताची घडी सोडू गुरुजी
की मारू कोलांटी उडी.

*सौ विमल धर्माधिकारी वाई, सातारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️➰🍃➰♾️♾️♾️♾️

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.🙏*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन /मुख्य प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार ‘आम्ही बालकवी’ काव्यसमूह*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे