व्याकरणदृष्ट्या आपलेपण जागवणारे ‘आम्ही चौघे’; शर्मिला देशमुख
मंगळवारीय 'आम्ही बालकवी' स्पर्धेचे काव्यपरीक्षण

व्याकरणदृष्ट्या आपलेपण जागवणारे ‘आम्ही चौघे’; शर्मिला देशमुख
मंगळवारीय ‘आम्ही बालकवी’ स्पर्धेचे काव्यपरीक्षण
“आम्ही चौघे” किंवा” सलग येणारे चार अक्षर” ही मराठी व्याकरणातील जोड शब्दांची किंवा एकाच अर्थाच्या किंवा प्रवाहाच्या चार शब्दांच्या समूहाची संकल्पना आहे. मराठी भाषेत आणि साहित्यात जेव्हा चार शब्दांची एक सुंदर साखळी किंवा यमक जुळणारा समूह एकत्र येतो, तेव्हा त्याला ही संज्ञा दिली जाते. या संकल्पनेचे मुख्य दोन प्रकार पडतात. सलग येणारे यमक जोडशब्द- यात चार शब्द सलग येतात, ज्यांचा उच्चार किंवा यमक एकमेकांशी जुळणारा असतो. बोलताना किंवा लिहिताना भाषेला सौंदर्य आणण्यासाठी हे वापरले जातात.
ही ‘अनुप्रास अलकांराची’ शब्दसौंदर्य संकल्पना प्रामुख्याने साहित्यिक ओळख, एकाच धाग्यातील चार स्वतंत्र कलाकृती किंवा विशिष्ट भाषिक रचनेशी संबंधित असते. आपण व्याकरणिक किंवा काव्यात्मक संकल्पनेचा विचार केला, तर या संकल्पनेला खूप महत्त्वाचे स्थान आहे. कवितेमध्ये किंवा रसाळ साहित्यात जेव्हा सलग चार किंवा अधिक शब्दांची सुरुवात एकाच अक्षराने होते तेव्हा त्याला ‘अनुप्रास अलंकार’ म्हणतात. उदाहरणार्थ “गळद गगन गरजच गेले .”येथे सलग येणारे अक्षर साहित्याला नादमाधुर्य मिळवून देतात.
पाश्चात्य साहित्याचा विचार करता जागतिक आणि मराठी साहित्यात ‘आम्ही चौघे’ एकत्र येऊन संकटांचा सामना करतो, ही एक अतिशय जुनी आणि लोकप्रिय मध्यवर्ती कल्पना आहे. अलेक्झांडर ड्यूमा यांच्या जगप्रसिद्ध “द थ्री मस्केटीयर्स” या कादंबरीवरून प्रेरित होऊन मराठीतही अनेक बालसाहित्य, साहसीकथा किंवा रहस्य कथा रचल्या गेल्या आहेत.
आणखी खोलात जाऊन विचार केलाच तर आम्ही चौघे या शब्दप्रयोगात आम्ही ‘प्रथम पुरुषी अनेकवचनी सर्वनाम’ आणि चौघे ‘संख्या विशेषण ‘ एकत्र येतात. साहित्यात ते एकत्र येतात तेव्हा एकात्मता, जवळीक , आपलेपण, प्रेम आणि समूह भावना दर्शवितात. आम्ही चौघे या चार अक्षरांच्या विचारांमध्ये एक विशिष्ट भाषिक लय आहे. ललित साहित्यात अशा सलग अक्षरांचा वापर संवादाला जिवंतपणा देण्यासाठी केला जातो. आम्ही चौघे या संकल्पनेमध्ये चार लेखक, चार कवी किंवा चार पेक्षा जास्त लेखक एकत्र येऊन एखादी कलाकृती, साहित्यकृती निर्माण करतात.
वरवर पाहता सरळ वाटणारा आम्ही चौघे हा शब्द गर्भितार्थ आणि मतितार्थ घेऊन येतो. शिलेदारांनी वरवर न पाहता राहुल दादांच्या दूरदृष्टीचा अभ्यास करून विषयाच्या गाभ्यात जाऊन रचना लिहिणे अपेक्षित आहे. नेहमीच अभ्यास पूर्ण विषय देण्यामागचा राहुल दादांचा हातखंडा नक्कीच ज्ञानात भर पाडणारा असाच आहे. आपल्या साहित्य लेखनात नवनवीन पद्धती, प्रकार, व्याकरणिय समतोल राखला जावा हाच उद्देश. अवघड विषय असला की लेखनाचे प्रयत्न कमी होतात. पण शिलेदारांनी तसे न करता अभ्यासपूर्ण लेखनाचा प्रयास करावा. पुढील लेखणीसाठी शिलेदार बंधू भगिनींना भरभरून शुभेच्छा व राहुल दादांचे शतशः ऋण! पुढील अभ्यासपूर्ण विषयाच्या प्रतिक्षेत. धन्यवाद!!
शर्मिला देशमुख -घुमरे, बीड
मुख्य परीक्षक/सहप्रशासक/कवयित्री
©संकलक मराठीचे शिलेदार समूह



