Breaking
कवितानागपूरमहाराष्ट्रविदर्भ

बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धेतील विजेत्यांच्या रचना

0 4 0 8 9 0

संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धा
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ कविता स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*????मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*????????????सर्वोत्कृष्ट दहा????????????*

*????विषय : असही घडते कधी कधी????*
*????बुधवार : १९/ जून /२०२४*????
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*असंही घडते कधी कधी*

असंही घडते कधी कधी
आतून दाटून येते खूप..
बरसावं तिथं बरसत नाही
नको तिथं भेटतो गुपचूप..

कधी तुझा मग चढतो पारा
जीवाची होई लाही लाही..
पुन्हा नव्याने भरून येतो
हळूच कानात सांगून जाई..

तुला साद घालता घालता
बघ घसा कोरडा पडला..
खूप खूप बोलावे वाटले
तेव्हा श्वासही गद्दार झाला..

तुझं आपलं बघ नेहमीचच
मी फार काही मागत नसतो..
ढगांनीच आता संप केला
आणि चक्क रूसून बसतो..

आठवता ते हसणं रूसणं
मन त्यातच होते दंग..
आणि हळूच देठ तोडतांना
व्याकुळ सारे अंग अंग..

*सौ सविता पाटील ठाकरे,सिलवासा*
*मुख्य परीक्षक,प्रशासक,कवयित्री*
*©मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*असंही घडते कधी कधी*

ठरवतो एक होतय एक
सलते सल मधल्या मधी
चुकतो निर्णय हुकते यश
असंही घडते कधी कधी.. //

धडपड अमाप होते तरी
हुकते कशी हातची संधी
कुठे ना कुठे पडतो कमी
असंही घडते कधी कधी.. //

गाफिल नव्हतोच तरीही
दिवसा तारे पाहिले नभी
सावध असून पारध होई
असंही घडते कधी कधी.. //

नाकासमोर चालणे तरी
म्हणतेय जग छंदी फंदी
राईचा पर्वत होतो कसा
असंही घडते कधी कधी… //

गधे, घोडे एकाच पंक्तीत
हंस,काक विपरीत जोडी
व्यर्थ केवळ शिर गणती
असंही घडते कधी कधी.. //

रेडा दुभता होईल कसा
हलवावी मान होवून नंदी
ज्याची काठी त्याची म्हैस
असंही घडते कधी कधी.. //

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*असंही घडते कधी कधी*

जीवन कधी का कुणा कळले
कधी कुठे ते कसे वळले
अमाप सुखाने कधी सळसळले
अपार दुःखाने कधी हळहळले ॥
कर्म आपले करीत रहावे
फळासाठी ना कधी रुसावे
विश्वास ठेवुनी कर्तुत्वावर
विश्वासघाताने कधी होरपळले ॥
अनाकलनीय घटना काही
घडून जातात जीवन प्रवाही
ओढून काळ थांबवावा आधी
असंही वाटते कधी कधी ॥
नियतीलाही कैद करावे
काळासही मूठबंद करावे
मृतात्म्यातही प्राण ओतावे
अशक्य ते शक्य करावे ॥
असंही वाटते कधी कधी
निसर्गचक्राचा खेळ सारा .
समतोल राखण्या ब्रम्हांडात या
बदलास मिळतो इथे थारा ॥
असंही वाटते कधी कधी
‘मी ‘ तून ‘ मी ‘ निघून जावे
वारा बनून मुक्त फिरावे
नदी बनून खळखळ वहावे ॥
वाफ बनूनी ढगात जावे
पाणी बनूनी मातीत मुरावे
माती बनुनी पुन्हा जगावे
असंही वाटते कधी कधी ॥

*सौ. सरला टाले राळेगाव यवतमाळ*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*????कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ३.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰????➰➿➿➿➿
*असंही घडते कधी कधी*

फूल ठेवून गेलीस जेव्हा
अलगद माझ्या खाटे वरती
कूस बदलली मी स्वप्नात
झाली पहाट सरती सरती

ऐकुन पक्ष्यांची किलबिल
नकळत मला जाग आली
स्वप्न भंगले लगेच अन
वास्तविकता मग समोर आली

असंही घडते कधी कधी
मी उगाच बडबडत असतो
स्वप्नही वाटते मज खरे
तेव्हा मी माझाच नसतो

ये भेटून घे एकदा तरी
जीव होतो गं वेडापीसा
कसा वागू मी चारचौघात
होतो गं मैफिलीत हसा

सूर तुझेच छेडतो
गीत तुझेच येते ओठी
गात्रे आता शिथिल झाली
आता गाठली गं साठी

*डॉ. संजय भानुदास पाचभाई नागपूर.*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*असंही घडते कधी कधी*

ध्यानी मनी नसताना
घडतात काही गोष्टी
विचार न करता कधी
भेटतात काही श्रेष्ठी

कधी आठवण काढतो
अपुल्या प्रिय आप्तेष्टांची
अचानक ते घरी येतात
योग असे येतात कधी

चालू असते सृष्टीमध्ये
भावनांची देवाण घेवाण
अप्रत्यक्ष आपल्यापर्यंत
पोहचती भावनेची जाण

कधी कधी ईच्छा नसताना
जाव लागते संकटांना समोर
असंही घडते कधी कधी
मनाविरूद्ध जातात दोर

पूर्वजन्मीचे काही संदेश
नकळत जाणवू लागतात
गुणदोषांची पडताळणी
त्यानुसार घडून जातात

कधी नसते मनात काही
बोलताना असे मैत्री भाव
वाटे त्याला विचित्र उलटे
गैरसमजाचे पडती डाव

सारासार विचारशक्ती सतत
ठेवावी लागते जागरूक
भय,शंका,शत्रुत्वभाव होतो
तेव्हाच कमजोर परास्त

*श्रीमती सुलोचना लडवे,अमरावती*
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*असंही घडते कधी कधी*

कुणाच्या आयुष्यात
कुणाच कधी येणं
हे नियतीचं आधीच
असतं ठरलेलं
ध्यानी मनी नसताना
वाटेत अनोळखीचं येणं
आणि नकळतं
आयुष्यचं बदलून जाणं
त्याच्या सोबतीने चालतांना
कठीण वाट.. सोपी वाटते
अनुत्तरीत.. प्रश्नही…
सहजच सुटू लागते
जीवनात पानगळ असतांना
त्याचं वसंतापरी येणं
स्वप्नांना उभारी देण्या
आत्मविश्वासाचे पंख देणं
खूप कठीण होतं मग
नात्याला शब्दात बांधणं
समाजाच्या व्यवस्थेला
न जुमानता पुढे जाणं
असंही घडते कधी कधी
जे कल्पनेतही नसतं
मग आपल्याचं प्रश्न पडतो
आयुष्यात असंही घडू शकतं?

*सौ.इंदू मुडे, ब्रम्हपुरी/चंद्रपूर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*असंही घडते कधी कधी*

असंही घडते कधी कधी
मनाला कुठे समजते काही
कुठेतरी हरवून जाते सहज
परतून मात्र येतच नाही

असंही घडते कधी कधी
अबोल शांत रहावे लागते
आत खोलवर सलते दुःख
मन कशास वेड्यागत वागते

शब्दातून बरसायला लागती
आठवणींच्या लाखो सरी
कितीतरी क्षण आनंदाचे
डोळ्यातून येती गालावरी

सांगण्यासारख बरच काही
तुला सांगून समजेल कसे?
मनाच्या कोऱ्या कागदावर
सुख दुःखाचे सुंदर ठसे

खुश होते वेडे मन माझे
हळुवार तुझ्या सोबतीत
एकमेकासोबत असताना
गुणगुणतो आपण प्रेमगीत

*सचिन पाटील*
*(अलिबाग रायगड)*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*असंही घडते कधी कधी*

का कुणाचं नशीब कुठे लिहून,
कोऱ्या कागदांवर लिहून नसतं,
आपणच त्याला रेषा ओघळल्या,
असंही घडते कधी कधी……..

ह्या घडामोडी पार करुनही,
माणूस स्वतःला सावरुन समोर,
हिंमतीने आपली कास सोडत,
असंही घडते कधी कधी………

उंबरठा ओलांडून एक स्त्री स्वतः,
संसारात तडजोड करून शिवत,
तिच्या समोर गुंतागुंत होऊन मन,
असंही घडते कधी कधी……….

जीवनाचे सार कुणी घडविले त्यात,
मनाशी आलेले वैराग्य, वेदना सांगू,
मन बैचेन झाले सोडून जावे कुठे,
असंही घडते कधी कधी……….

परीस्थितीचा सामना करण्यासाठी,
रात्रंदिवस मेहनत करून झोळी भरेना,
का ह्या देहाला आकार तरी घ्यावे,
असंही घडते कधी कधी…..,…….

स्वप्ने मोठी डोळ्याभितरी आखुन,
नाही झाली की मनाशी जुळायला,
पुरावे गोळा करून शिवत नाही ती,
असंही घडते कधी कधी…………

नको ती गोळाबेरीज मांडायला कमीच,
पुरे होईना आयुष्य थांबून थकलं आहे,
आशा आकांक्षा करून काय उपयोग,
असंही घडते कधी कधी…………..

*सौ.नंदा नथ्थुजी कामडी चंद्रपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*असंही घडते कधी कधी*

अनोळखी नयन
नयनात खिळले
नजरेची भाषा
नजरेत बोलले

उठता समोरून
कोण विरह वेदना
जागल्या कशाच्या
मनी संवेदना

धडधड मनी
जुळती ह्दयाचे धागे
काळ जणू थांबला
जाई मागे न पुढे

का क्षण बावरा
हुरहूर दाटली
विचार पातळी
कशी ती खुंटली

मिळाली न मला
क्षणभराची संधी
स्वप्नातील हा संयोग
असंही घडते कधी कधी

*शर्मिला देशमुख -घुमरे, बीड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*असंही घडते कधी कधी*

असंही घडते कधी कधी
आयुष्याचा आस्वाद घेतांना
कल्पनेच्या परे काही गोष्टी
थक्क होई विचार करतांना

जन्म देतात मायबाप
लहानाचे मोठे करतात
नंतर हीच कार्टी त्यांना
वृद्धाश्रमात पाठवितात

वयाच्या ऐंशीव्या वर्षी सुद्धा
म्हातारा राही ठणठणीत
एखादं कोवळ बालक
गुरफुटते आजाराच्या मिठीत

कुणाकडे पैसा असूनही
संपत नाही त्यांच्या गरजा
रोजी रोटी वर असणारे
आयुष्याची घेतात मजा

ज्या वस्तूंचा येतो कंटाळा
वारंवार तीच नजरेत दिसते
जी हवी आहे ती जवळपास
असून सुद्धा कुठं मिळते

*कुशल गो डरंगे, अमरावती*
*© सदस्य मराठीचे शिलेदार समूह*

➖➖➖➖????????????➖➖➖➖

*????सर्व विजेत्यांचे अभिनंदन* ????
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*????

➖➖➖➖????????????➖➖➖➖
*????????संकलन / समूह प्रशासक????????*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*????मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖????????????➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 8 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे