0
4
8
2
9
4
जुगाड
जीवनगाडी हाकताना
होतो कधी कधी बिघाड
जागीच नसतं थांबायचं
करावाच लागतो जुगाड.. //
मी खाईन तर तुपाशीच
असा अट्टाहास नसावा
कधी भुकेला कोंडा तर
निजेला धोडा असावा.. //
अंगठाच तुटला म्हणून
चप्पल का फेकायची?
टाका मारून तेवढीच
वेळ निभावून न्यायची.. //
जुगाड तंत्राचे नियम हे
कुठे पुस्तकात नसतात
अडाणी अथवा शहाणा
ते मस्तकातच असतात..//
प्रसंग बाका असे तेव्हा
लागायला हवाय शोध
हे एक नैसर्गिक वरदान
ज्याचा व्हावा हवा बोध.. //
विष्णू संकपाळ, बजाजनगर
छ. संभाजीनगर
===========
0
4
8
2
9
4



