
0
4
8
2
8
4
जीवन जगताना
जीवन जगताना ,नुसता श्वास नको।
या आयुष्यासाठी ,विषारी घास नको।।
जन्म म्रुत्युचा फेरा, सुख दुःख सोबती।
कापूर काया व्हावे , कुठे अगरबत्ती।।
प्रेम करावे जीवनी,सजग राहूनिया।
जाईल लोभामुळे,जीवन व्यर्थ वाया।।
त्या चढ उताराने , संघर्ष पदोपदी।
बुडबुडे होऊनी ,वागू नको आनंदी।।
चिंता दूर सारुनी , आज जगून घ्यावे।
राग द्वेष त्यागूनी , नित्य प्रेम अर्पावे।।
वेदना सोसतांना, शरीर राख होते।
रात्र दिवस होते , दिवस रात होते।।
थांबू नकोस तरी , वाटेत जीवनी या।
सूर्यासंगे दिसेल ,तेव्हाच तुझी छाया।।
गोवर्धन तेलंग
पांढरकवडा. जि यवतमाळ
0
4
8
2
8
4



