Breaking
अलिबागअहमदनगरआरोग्य व शिक्षणकोकणदेश-विदेशनवी दिल्लीनागपूरपरीक्षण लेखमहाराष्ट्रमुंबईराजकियविदर्भसंपादकीयसाहित्यगंध

मोदींचे डोके ठिकाणावर आहे का…?

0 1 8 3 9 9

मोदींचे डोके ठिकाणावर आहे का…?

शिवपुतळाप्रकरणी मोदी महादोषी आहेत आता तर. स्वराज्याचे दुश्मन असलेल्या महाराष्ट्रातील गद्दारांच्या नादी लागून आता “मोदींचे डोके ठिकाणावर आहे का…?” असाच प्रश्न विचारावा, अशी स्थिती सध्या आहे. कुठे इंग्रजांकडे वारंवार माफी मागून, स्वत:च्या प्राणाची याचना करणारे विनायक सावरकर, जे नंतर ब्रिटिश पेंशनवर जगले आणि कुठे महापराक्रमी छत्रपती शिवाजी महाराज. ही तुलनाच होऊ शकत नाही. एक माफीवीर आणि दुसरे महापराक्रमी वीर. बरं ब्रिटिश पेंशनवर जगणाऱ्या सावरकर यांनी ‘सहा सोनेरी पाने’ या पुस्तकात शिवाजीराजांच्या उच्च संस्कारांना ‘सद्गुण विकृती’ म्हणून हिणवले होते. यावरून त्यांना, संघाला राजांचे उच्च संस्कार झेपणारे नव्हते हेच दिसते. मोदींचे संस्कार संघाचेच. यांना राजे काय कळणार? “शिवाजी महाराजांनी मुसलमान स्त्रियांची विटंबना करायला हवी होती, मुस्लिम स्त्रियांवर प्रत्याचार करायला हवा होता,” असे सुचविणारी सावरकरांची मानसिकता. या विचारसरणीच्या पाठीराख्यांना आजतरी आया-बहिणींची किंमत काय असणार? म्हणून भाजपमध्ये रेवन्ना निपजतो, बृजभूषण पैदा होतो, मुलींना पळवा म्हणणारे राम कदम सारखे अनेक जणही संघ-भाजपच्या कळपात बिनधास्त पाळले जातात…. हे असले विचार उचलून धरणारे यांचे विकृत आणि घाणेरडे संस्कार. मोदीही शेवटी त्याच पठडीतील बोलले. त्यांना शिवाजी महाराज काय कळणार? विनायक सावरकर हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या यत्किंचितही आसपास फिरकू शकत नाहीत. भाकड गाय कापून खावी वैगेरे सावरकरांचे वास्तववादी विज्ञानवादी विचार अलहिदा; पण त्यांना महाराजांच्या नखाचीही सर येणार नाही. त्यामुळे संघाच्या मंडळींनी छत्रपती शिवाजी महाराज आणि इंग्रजांची माफी मागणारे, स्वतः शिवरायांना हिणवणारे सावरकर अशा या तुलनेने पिल्लू आजिबात सोडू नये. कुठे देदीप्यमान कामगिरी करणारे छत्रपती शिवराय आणि कुठे तुमचे विनायक सावरकर! भ्रष्ट सरकारच्या कुचराई, बेफिकिरी अन् गद्दारीने पुतळा पडला ही अत्यंत दुर्दैवी घटना; पण स्वराज्यासाठी जीव पणाला लावून लढणाऱ्या शिवरायांची ब्रिटिश पेन्शन घेणाऱ्या सावरकरांशी मोदी करू पाहत असलेली तुलना हे तर त्याहून महादुर्दैवी. मोदींनी, संघाच्या पाठीराख्यांनी स्वराज्याचा इतिहास कलंकित करणारी आणि महापराक्रमी महाराजांना अवमानित करणारी, त्यांच्या नखाचीही सर नसलेल्यांशी तुलना करण्याचे पेशवाई धंदे थांबवावेत. महाराष्ट्राची जनता हे आजिबात खपवून घेणार नाही. *तुमचे सावरकर तुमच्यापाशी ठेवा, त्यांना डोक्यावर घेऊन नाचा, पूजन करा, हवे ते गुणगान गा;* पण आमच्या रयतेच्या *राजाशी, सर्वधर्म समभाव* जपणाऱ्या महाराजांशी त्यांना जोडून आजिबात तुलना करण्याच्या फंदात पडू नका. मोदीसाहेब, आपण आनंदीबाई नागपूरकरच्या जातीयवादी, मनूवादी, विकृत डोक्यातील स्क्रिप्टला तर बळी पडला नाहीत ना? आपल्याला हे नक्कीच शोभले नाही. आपण आमच्या महापराक्रमी महाराजांचे अवमूल्यन करू पाहिले. त्यामुळे आता *संघाचे वर्णवादी, वर्चस्ववादी* विचार बाजूला ठेवून पुन्हा एकदा शिवप्रेमींची अन् या महाराष्ट्राची स्वच्छ, प्रांजळ मनाने माफी मागा. यापुढे चुकूनही असली तुलना करायच्या फंदात आपण पडू नये. ते महाराष्ट्र, जगभरचे शिवप्रेमी मुळीच सहन करणार नाही.
जय शिवाजी! जय भवानी! जय महाराष्ट्र!
– *विक्रांत पाटील*

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 8 3 9 9

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे