Breaking
आरोग्य व शिक्षणनागपूरमहाराष्ट्रविदर्भ

जैन हेरीटेज अ कॅम्ब्रींज स्कूल मध्ये स्वातंत्रदिन उत्साहात साजरा’

जिल्हा प्रतिनिधी नागपूर

0 4 8 2 9 3

‘जैन हेरीटेज अ कॅम्ब्रींज स्कूल मध्ये स्वातंत्रदिन उत्साहात साजरा’

जिल्हा प्रतिनिधी नागपूर

फेटरी, नागपूर येथे स्थित असलेल्या जैन हेरीटेज अ कॅम्ब्रींज स्कूल मध्ये ७८ वा स्वातंत्रदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला पाहुणे म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय रानू सहानी मॅम व उपमुख्याध्यापिका माननीय अर्चना तिवारी मॅम तसेच विशेष अधिकारी माननीय अनंत दुबे सर यांनी हजेरी लावली. कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून तसेच थोरपुरुषांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय रानू सहानी मॅम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पूर्व प्राथमिकच्या विद्यार्थ्यांनी आपल्या नृत्यातून देशभक्ती दर्शविली तसेच इतर विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून, कवितेतून, गीतातून, नृत्यातून तर विविध वेशभूषेतून स्वातंत्र्याचे महत्त्व

स्पष्ट करून स्वातंत्रसैनिकांचे महत्त्व सांगितले. सोबतच एका छोट्याश्या नाटिकेतून ‘जालियनवाला बाग हत्याकांड’ सादरीकर करून त्यावेळची प्रत्यक्ष परिस्थिती दाखविण्यात आली. अंगावर शहारे आणणारे असे हे सादरीकरण होते. असे विविध सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वातंत्र्याचे महत्त्व सांगण्यात आले. मुख्याध्यापिका माननीय रानू सहानी मॅम यांनी विद्यार्थ्यांना आपल्या भाषणातून स्वातंत्र्याचे महत्त्व स्पष्ट करून सांगितले सोबतच अभ्यासाप्रती असलेली जिद्द, चिकाटी व मेहनत यांचे महत्त्व समजावून सांगितले.

स्वातंत्रदिनाचे महत्त्व हे केवळ एक दिवसाचे नसून ज्या स्वातंत्रवीरांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन हे स्वातंत्र मिळविले त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करून मिळालेले स्वातंत्र टिकविणे महत्त्वाचे आहे. कार्यक्रमाचे संचालन वर्ग दहावीच्या विद्यार्थिनी कु. नंदिनी डाबरे व कु.चांदनी सातपुते यांनी केले; तर कु. दिव्या नाईक या विद्यार्थिनीने कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाला शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे