Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूरपरीक्षण लेखविदर्भसाहित्यगंध

गाडीवाला आया

कुसुमलता दिलीप वाकडे दिघोरी रोड,नागपूर

0 4 8 2 9 3

गाडीवाला आया

” देख देख तू यहा वहा ना फेक, देख देख तू यहा वहा ना फेक, देख पहले की बिमारी है होगा सबका बुरा हाल, तो क्या करे भैय्या ?, गाडीवाला आया घरसे कचरा निकाल . “आई गं कचरेवाला आला” अशी घरात मोठयानी कुणी तरी आवाज देतो.आपण त्यांना कचरेवाला म्हणतो, जे की हे चुकीचे आहे. आपण आपल्याच घरातील कचरा जमा करतो व त्यांना देतो म्हणून कचरावाला ते नाहीत, तर आपणच कचरावाले आहोत. घरात कचरा साठवून ठेवतोय. त्यातल्या त्यात बर्‍याच गृहिणी ओला व सुखा कचरा वेगवेगळा न करता एकाच डस्टबिन मध्ये टाकतात जे की ओला व सुखा कचऱ्याची डस्टबिन वेगवेगळी करायला हवी. चिरलेल्या भाज्याच्या साली, टरफल, शिळे अन्न इत्यादी आपल्या प्रत्येकाच्या घरी नको तेवढा कचरा निघतो दररोजच्या स्वयंपाक खोलीतील खरकटं, उष्टे अन्न, शिळे अन्न, मोरीतील सांडपाणी, कचरा, कुजलेले सडलेले कागद, कापड, अडगळीतील कचरा थोडा जरी दिसला की टाकला कचरापेटीत.

हेच जर कपडे अनाथाश्रमातील मुला, मुलीना वृध्दांना ,गोरगरीबांना देणार नाहीत कुजके होत पर्यंत मी घालणार, मी घालणार नंतर घालणार म्हणून कपाटात पडेल राहतील. देवाची पुजा झाल्यावर निर्माल्य सुध्दा आपण कचरापेटीत टाकतो अशा वेळेस विहीर ,नदी, पाण्यात सोडणे सुध्दा चुकीचे आहे. हीच फुले घरातील झाडांची पाने वाळवून खत म्हणून याचा आपल्याच कुंडयात किंवा झाडाना खत म्हणून वापर करता येईल. तरच नदया,विहीर, सरोवर स्वच्छ राहतील.

आपल्याला थोडा जरी दुर्गंधीत वास आला की, आपण नाकाला बोटांनी दाबून धरतो किंवा नाकातोंडावर रुमाल ठेवतो. अर्थात तुम्ही मानव तुम्हाला असले वास घेताना गुदमरल्यासारखे होतयं. मग त्या बिचार्‍याचा जीव नाही का ? ते तर आपल्या सोबत सदैव तेवढी दुर्गंधीत गाडी हाकत असतात. कधी आपण त्यांना साधा चहा तर सोडा साधं पाणी हवं का ? हे सुद्धा विचारीत नाही. म्हणूनच मी म्हणते की, तो गाडीवाला कचरावाला नाही तर आपणच कचरावाला आहोत. आपल्यापासूनच या स्वच्छतेच्या कार्यदक्षतेला सुरवात झाली तरच आपण अभिमानाने म्हणू शकणार ” स्वच्छ भारत सुंदर भारत “

कुसुमलता दिलीप वाकडे
दिघोरी रोड,नागपूर
======÷

1/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे