कवितानागपूरपश्चिम महाराष्ट्रमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध
गालगुच्चा; पोपट म्हस्के
0
4
8
2
9
7
गालगुच्चा
पांडू होता लहान
करामती त्याच्या महान
खोड्या करण्या पटाईत
सगळे त्याला आडवीत
पांडू उठला लवकर
पळत सुटला बाहेर
हातात विटी दांडा
वाटेत पाण्याचा हंडा
सगळे पाणी सांडले
मम्मी पप्पा भांडले
ताईने पांडूला पकडले
पप्पा पुढे उभे केले
पप्पाला आला राग
सर्वांची माफी माग
शर्टाचा धरला गच्चा
पांडूचा घेतला गालगुच्चा
पोपट सुखदेव मस्के
ता.पंढरपूर जि. सोलापूर
=========
0
4
8
2
9
7



