ई-पेपरकवितादेश-विदेशनागपूरपश्चिम महाराष्ट्रमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध
रानफूल
श्री.संग्राम कुमठेकर
0
4
8
2
9
5
रानफूल
भ्रमर कशी घालती पिंगा ?
खुललेले पाहून ते रानफूल
दाखवशील का सांग इंगा ?
काढण्या डोक्यातील खूळ
खुळ्यागत कशी न्याहाळती ?
नजरेंनी त्या वखवखलेल्या
गुंजन घालूनच ती गोंजारती
दुष्ट भावनांनी पिसाळलेल्या
पिसाळलेल्या या भ्रमरांना
मधुगंध चाखण्याचीच आस
गोडीगुलाबीनेच पाखरांना
पाकळ्यांचा लाव तूच फास
फास्यात अडकता भ्रमरांना
वाचविल कोण रे संकटातून
स्वप्नभूल समजून रे नेत्रांना
दूर होतील क्षणिक सुखातून
क्षणिक सुखामागे धावताना
दिसता रानफूल का तोडता ?
रानफूलास हात रे लावताना
लाज वाऱ्यावर का सोडता ?
लाज वाऱ्यावर का सोडता ?
श्री.संग्राम कुमठेकर
जिल्हा लातूर
========
0
4
8
2
9
5



