
होऊन दाखव सावित्रीची लेक
सावित्रीची लेक तू आहेस का ग भोळी
कंबर कसून हो तयार कर जीवनाची होळी
नाही पटलं तर समाजाला जा विसरूनी
वेळ आली आता घे स्वतः सावरुनी!!१!!
सोडू नको तू हातातली पुस्तकं आणि पाटी
शिक्षणानेच विरोधकांचे विचार कर छाटणी
का करते समाजाचा विचार एवढा
घे शिक्षणाचा हवा तो निर्णय तेवढा !!२!!
सावित्री जर नसती तर काय झाले असते
या समाजानेच तर तिच्या तोंडावर शेण लिपीले
घाबरली नाही या निर्दयी समाजाला
शिक्षण घेऊन साथ दिली तिने ज्योतिबाला!!३!!
साऱ्या स्त्री जातीला सावरलं तिचं सावित्री माय ग
अभिमानाने जगात वावरायला शिकवले तिनेच ग
उपवास, तापास नको करू नको करूस व्रत ग
शिकलेली तू असूनही अंधश्रद्धेत बळीच पडतेस ग!!४!!
शोषितांची वाणी होऊनी कर जागृत हा समाज ग
दगडाच्या देवामध्ये नसतोच देव आत्तातरी तू जाण ग
अन्यायावर, अत्याचारावर कर तू प्रहार ग
आठवून बघ एकदा तरी सावित्रीचा त्याग ग!!५!!
सुरेखा रावसाहेब चित्ते कांबळे
श्रीवर्धन जि. रायगड
==========