Breaking
ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भसाहित्यगंध

सोमवारीय ‘त्रिवेणी’ काव्यस्पर्धेतील विजेत्यांच्या रचना

मुख्य संपादक राहुल पाटील

0 4 8 2 9 0

➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*☢️संकलन, सोमवारीय ‘त्रिवेणी’ काव्यस्पर्धा☢️*
➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘सोमवारीय त्रिवेणी काव्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट चौदा🎗🎗🎗*

*📘स्पर्धेचा विषय : वाटाण्याच्या अक्षता📘*

*🔸सोमवार : ०८/ १२ /२०२५*🔸
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*खालीलविजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध अंक १९६ साठी लवकर साहित्य पाठवावे.*
♾️♾️♾️♾️💐〽️💐♾️♾️♾️♾️

*वाटाण्याच्या अक्षता*

तयार आहेत जन हो
लावायला वाटाण्याच्या अक्षता
सांभाळा.. वेळीच घ्या दक्षता

*सविता धमगाये*
*नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔸🌹🔸♾️♾️♾️♾️
*वाटाण्याच्या अक्षता*

मंत्री महोदय आले धावून
कार्यकर्ते उभे निवेदने घेऊन
गेले वाटाण्याच्या अक्षता लावून…

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔸🌹🔸♾️♾️♾️♾️
*वाटाण्याच्या अक्षता*

आश्वासनाला जाऊ नका भुलून
मतदान करा जरा विचारपूर्वक
जातील वाटाण्याच्या अक्षता लावून

*सौ. प्रांजली जोशी, विरार, पालघर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔸🌹🔸♾️♾️♾️♾️
*वाटाण्याच्या अक्षता*

निवडणूक संपली की देतात
हाती वाटाण्याच्या अक्षता
आधीच बाळगा की दक्षता

*बी एस गायकवाड*
*पालम परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔸🌹🔸♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ४.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*वाटाण्याच्या अक्षता*

वाटले नव्हते कधीच मजला
पडतील हाती वाटाण्याच्या अक्षता
नाहीतर घेतली असती दक्षता

*श्री.भोसले तानाजी निवृत्तीराव*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔸🌹🔸♾️♾️♾️♾️
*वाटाण्याच्या अक्षता*

तुझ्या माझ्यात झाला होता करार
आयुष्यभर साथ देण्याचा
वाटाण्याच्या अक्षता देवून झालास फरार

*डॉ.सौ.मंजूषा साखरकर*ब्रह्मपुरी जि.चंद्रपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार*समूह*
♾️♾️♾️♾️🔸🌹🔸♾️♾️♾️♾️
*वाटाण्याच्या अक्षता*

नखरे तीचे झेलण्यात माझे आयुष्य गेले सारे
वाहिले ना तरीही प्रेमाचे वारे..
“भाऊ”म्हणत वाटाण्याच्या अक्षता देऊन गेली पुढे

*सौ वनिता गभणे आसगाव भंडारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔸🌹🔸♾️♾️♾️♾️
*वाटाण्याच्या अक्षता*

*आश्वासनांच्या उठवतील वावटळी*
*वाटाण्याच्या अक्षता मारतील भाळी*
*राहशील गाफील जर मतदारराजा*

*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔸🌹🔸♾️♾️♾️♾️
*त्रिवेणी— वाटाण्याच्या अक्षता*

जो झीजतो कार्यकर्ता
त्याला वाटाण्याच्या अक्षता
पुढऱ्याला आयती मालमत्ता.

*सौ, इंदु मुडे, ब्रम्हपुरी/चंद्रपूर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समह*
♾️♾️♾️♾️🔸🌹🔸♾️♾️♾️♾️
*वाटाण्याच्या अक्षता*

*कधीही एखाद्याला देवू नये*
*वाटाण्याच्या अक्षता*
*काटेकोरपणे घ्यावी याची दक्षता*

*डाॅ. नझीर शेख राहाता*
*जिल्हा अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔸🌹🔸♾️♾️♾️♾️
*वाटाण्याच्या अक्षता*

माझ्यासहित सर्वांनी घ्यावी
वेळीच काव्यलेखनाची दक्षता
अन्यथा वाटाण्याच्या अक्षता

*दत्ता काजळे*
*उमरगा जि.धाराशिव*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔸🌹🔸♾️♾️♾️♾️
*वाटाण्याच्या अक्षता*

मुख्यमंत्र्यांच्या लेखी आदेशाला
अधिका-यांच्या वाटाण्याच्या अक्षता
बळीराजाच्या आर्थिक मदतीला.

*प्रवीण हरकारे*
*ता. नगर जि. अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔸🌹🔸♾️♾️♾️♾️
*वाटण्याच्या अक्षता*

नसते कधी, वाऱ्यावर वरात
नको वाटू वाटण्याच्या अक्षता
सामना करावे सत्याचा मनात.

*मायादेवी गायकवाड ठोकळ*
*ता मानवत,जि. परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔸🌹🔸♾️♾️♾️♾️
*वाटाण्याच्या अक्षता*

तिच्या मागे मागे फिरण्यात
करिअर गेले त्याचे पाण्यात
दिल्या तिने वाटाण्याच्या अक्षता हातात

*शर्मिला देशमुख -घुमरे, बीड*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.🙏*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन /मुख्य प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार ‘त्रिवेणी’ काव्यसमूह*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे